“शिवाजी विद्यापीठातील विविध अधीविभागातील प्राध्यापकांचा संप”

    41

    ✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    कोल्हापूर(दि.1नोव्हेंबर):- शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विविध अधीविभागातील विद्यापीठ निधी वरील प्राध्यापकांचा दि. 6 ऑक्टोबर 2020 पासून संप सुरू आहे. सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी, पीएचडी इन्क्रिमेंट तसेच कॅस मार्फत पदोन्नती या सह अन्य मागण्यांसाठी सदर संप सुरू आहे.विद्यापीठात सध्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा त्याचबरोबर विविध अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. परीक्षा व प्रवेश या महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन संपाचे स्वरूप सुरुवातीला काळी फीत लावून काम करणे असे आहे.

    मात्र प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक विचार केला नाही तर नाविलाजाने आंदोलन तीव्र करावे लागेल असा विचार संपातील शिक्षकांनी व्यक्त केला. संपाचे आंदोलन तीव्र केल्यास त्याचा परिणाम येऊ घातलेल्या नँक मानांकनवर व एकूणच विद्यापीठाच्या गुणवत्तेवर होऊ शकेल.सदर मागण्यांसंदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडे यापूर्वीही लेखी निवेदन व भेटी घेऊन या विषयी वेळोवेळी पाठपुरावा केला तरी त्या दृष्टीने कोणतीही सकारात्मक चित्र विद्यापीठ प्रशासनाकडून येत नसल्यामुळे नाविलाजाने संपाचे हत्यार प्राध्यापकांना उचलावे लागले. संपा संदर्भातील मागणीचे निवेदन प्रत्यक्ष संपापूर्वीच विद्यापीठ प्रशासनाला दिले.

    ?संपातील प्राध्यापकांच्या प्रमुख मागण्या –
    1) सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू करावा.

    2)सातव्या वेतन आयोगातील यापूर्वीचा फरक सत्वर मिळावा.

    3) पीएचडी धारक शिक्षकांना तत्काळ संबंधित इन्क्रिमेंट मिळावेत.

    4) कँस पद्धती अंतर्गत पदोन्नती संदर्भातील प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी.

    5) डी सी पी एस यासंदर्भात सद्यस्थिती व प्रश्न सोडवावेत.