पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मराठा समाजातील संदीप जाधव यांच्या कुटूंबास मिळाली चार लाख मदत

29

🔸लोकप्रिय नेते वैभवजी गिते साहेबांच्या खडतर पाठपुराव्याला यश

✒️संजय कांबळे माकेगावकर(अहमदपूर प्रतिनिधी)मो:-9860208144

अहमदपूर(दि.2नोव्हेंबर):-नैसर्गिक आपत्तीत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुराच्या पाण्यात कुरबावी ता.माळशिरस जि.सोलापूर येथील मराठा समाजातील गरीब कुटुंबातील विवाहित तरुण कळस ता.इंदापूर येथून पाण्यात वाहून गेला होता.संदीप जाधव यांचा स्वभाव अतिशय मायाळू असल्याने कुरबावी गावासह पंचक्रोशीतील गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात पत्नी एक वर्षाचा मुलगा आई व वडील असे कुटुंब आहे. विशेष बाब म्हणजे माळशिरस तालुक्यातील कोणत्याही आमदारांनी व माढा लोकसभेचे खासदार यांनी कुरबावी ता.माळशिरस येथे येऊन संदीप जाधव यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले नाही.

एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य महासचीव ऍड.डॉ.केवलजी उके साहेबांच्या मार्गदर्शनात आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस गावचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने वैभव गिते, प्रमोद शिंदे,संजय झेंडे,बाबासाहेब सोनवणे,दत्ता कांबळे,संभाजी साळे,यांनी निवासी नायब तहसीलदार देशमुख यांची भेट घेऊन संदीप जाधव यांच्या कुटुंबियांना तातडीची मदत तात्काळ देण्यात यावी यासाठी निवेदन देऊन चर्चा केली होती.

तसेच लोकप्रिय नेते वैभव गिते साहेबांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे कळवले होते तसेच इंदापूर तालुक्यातील आमदार व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती तसेच भेट घेऊनही निवेदन दिले होते.या घटनेची सविस्तर माहिती वैभव गिते साहेबांनी बारामतीचे कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याशी चर्चा करून त्वरित कार्यवाही करण्याची वीनंती केली होती.

प्रांत दादासाहेब कांबळे यांनी तहसीलदार इंदापूर यांना त्वरित कार्यवाही करून अहवाल पाठवण्याचे आदेश दिले होते.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे नेते शंकर थोरात व तालुकाध्यक्ष वैभव धाइंजे यांनी तहसीलदार यांना सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली अखेर आज तहसीलदार इंदापूर जि. पुणे यांनी संदीप जाधव यांची पत्नी सारिका संदीप जाधव यांच्या नावाने चार लाख रुपयांचा चेक दिला असल्याची माहिती एन.डी.एम.जे संघटनेचे नेते शंकर थोरात यांनी दिली.

संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी खडतर पाठपुरावा केल्यामुळे नैसर्गिक आपत्तीग्रस्त मराठा समाजातील जाधव कुटुंबास झटपट मदत मिळाली त्यामुळे जाधव कुटुंबाने लोकप्रिय नेते वैभव गिते व त्यांच्या संपूर्ण टीम चे आभार मानले आहेत.अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख वैभव काटे यांनी दिली आहे.