पत्रकारांना मानधन व निधी मिळावा पत्रकार कमल कर्डक यांची मागणी

28

✒️सुनिल ज्ञानदेव भोसले(पुणे प्रतिनिधी)

पुणे(दि.2नोव्हेंबर):-गेले आठ महिण्यापासुन कोरोना लॉकडाऊन मध्ये रात्रंदिवस संपुर्ण भारतामध्ये पत्रकार ठिकठिकाणी जाऊन, गावोगावी चौकशी करून त्यांना मदतीचा हात दिला, जनतेपर्यत जनतेपर्यत बातमीच्या माध्यमातुन जनजागृतीचे काम केले. कोरोनामध्ये पत्रकार मरण पावले व त्यांचे संसार उघड्यावर पडले, त्यांना घर चालवणे अवघड झाले आहे.पत्रकारां ना विमा ५० लाखा पर्यत मंजुर करण्यात यावा. महाराष्ट्रत सर्व पत्रकारांना मिळावा.

जे पत्रकार कोरोनाच्या काळात मरण पावले आहे, त्यांच्या घरच्यांना व कुटुंबातील एकाला शासना तर्फ सरकारी नोकरी मिळावी किंवा त्यांच्या कुटुंबातीला कायम स्वरुपी मानधन चालु करावे, शासन कोठ्यातुन निधी मंजुर करावा. असे केसरी मराठवाडा चे पत्रकार कमल कचर कर्डक यांनी सांगितले आहे. पत्रकार व सर्व मीडिया चॅनल संघटनामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांना निवेदन देणार आहे. सर्व पत्रकारांना न्याय मिळावा व आम्ही केलेली मागणी मंजुर व्हावी, अशी मराठवाडा केसरीचे पत्रकार कमल कचर कर्डक यांनी केली आहे.