मंगल मैत्री आणि अमंगल मैत्री असे काही नसते

31

🔹चार्वाक वनात भरली धम्मसंगीती

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.2नोव्हेंबर):-मैत्री मंगल आणि पवित्रच असते.मंगल मैत्री आणि अमंगल मैत्री असे काही नसते.गुन्हेगाराचीही मैत्री असते आणि समाजकंटकाची मैत्री असते असे म्हटले जाते.ती मुळात मैत्री नसते.ते गुन्हा करण्याच्या हेतूने केलेले त्याचे गटबंधन म्हणता येईल.मैत्रीत व्यवहार नसतो.ती निख्खळ प्रेम असते .मैत्रीभाव ठेवणे ही बाब वैयक्तिक आहे.कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता संपूर्ण प्राणीमात्रावर प्रेम करा असे तथागत म्हणतात .या सूत्रांत विरोधी पक्षाच्या प्रतिसादाची आवश्यकता नाही.

माणसाला प्राणीमात्रावर एकतर्फी प्रेम करता येते.त्यामुळे जी मैत्री निरपेक्ष भावनेने केली जाते ,तीच ‘ मंगल मैत्री होय’ ‘ अशा आशयाचे मत दि.३१ आक्टोबर २०२० रोजी चार्वाक वनात भरलेल्या धम्मसंगीतीत व्यक्त झाले आहे. परिपाठाप्रमाणे धम्मसंगीतीचे आयोजन आश्विन पौर्णिमेला करण्यात आले होते.संगीतीचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत जिल्हाधिकारी (म.रा.) मनोहरराव भगत होते.

प्रारंभी चार्वाक वनातील बुद्धमूर्तीसमोर सामुदायिक त्रिशण,पंचशील आणि वंदना झाली आणि त्यानंतर म.फुले,सावित्री माता आणि डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना ,संगीतीच्या अध्यक्षानी पुष्प अर्पण केले व संगितीला सूरूवात झाली. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचा स्मृतीदिन असल्याने त्यांना श्रद्धाजली अर्पण करण्यात आली तसेच संत सेवालाल महाराज यांचे वशंज संत रामराव महाराज पोहरादेवी यांचे दुःखद निधन झाले, त्यानिमात्त रामराव महाराजांना श्रद्धांजली आर्पण करण्यांतआली.

भारताचे लोहपुरूष स्मृतीशेष सरदार वल्लभभाई पटेल जयंती असल्याचे संजय आसोले यांनी स्मरण दिले.धम्मसंगीतीने सरदार पटेल यांनाही आदरांजली अर्पण करून अभिवादन केले आणि त्यानंतर संगीतीच्या कार्यवाहीस सुरूवात झाली.

डी.जी.गोस्वामी यांनी मागील पौर्णिमेचा वृतांत सादर करून मंगल मैत्रीचे महत्व विशद केले.त्यानंतर उपा.पी.बी.भगत यांनी आश्विन पौर्णिमेचे बौद्धधम्मातील महत्त्व सांगून मंगल मैत्रीबाबत सविस्तर माहिती दिली.मैत्रीमध्ये शीलाला अन्यन्य महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले आणि गुन्हेगाराची मैत्री ही अमंगल मैत्री असे मत व्यक्त केले.बौद्ध साहित्याचे अभ्यासक उपा.प्रकाश कांबळे यांनी मैत्री संबंधी विस्तृत विवेचन केले.

मैत्रीचे तरंग निर्माण होतात आणि त्यामुळे इतराच्यात मैत्रीभाव निर्माण होतो असे प्रकाश कांबळे यांनी सांगितले.प्रकाश कांबळेशी सहमत होत अॕड.अप्पाराव मैन्द म्हणाले की,म.फुलेच्या मैत्रीभावाच्या तरंगामुळेच त्याच्यावर पाठविलेले मारेकरी त्यांचे संरक्षक झाले , तसेच तथागताच्या मैत्रीभावाने अंगुलीमालसारखा खुंगार डाकू शरण आला आणि भिकू झाला.हा परिणाम मंगल मैत्रीचाच आहे.चार्वाक वनातील विविध उपक्रम मैत्रीभाव वाढविण्यासाठीच आहेत,असेही सांगितले.या चर्चेत यशवंतराव देशमुख , नामदेव राठोड,गोवर्धन मोहिते,संजय आसोले,दगडू कांबळे यांनी भाग घेऊन मंगल मैत्रीबाबत मतं व्यक्त केलीत.

पंजाबराव किसनराव मेश्राम आणि मारोतराव शेंडे उभयता रा.यवतमाळ ,प्रथमच धम्मसंगीती उपस्थित झाले होते.त्याचे स्वागत संगीतीचे अध्यक्ष मनोहरराव भगत यांनी पुष्प देऊन केले.संगीतीत के.व्ही.मुनेश्वर, एन.डी.तातेवार,यशवंत कांबळे,साहेबराव गुजर ,वामनराव देशमुख , गोविंद तलवारे, यशकुमार भरणे,रामदास नरवाडे ,अनिल डोंगरे, सुधाकर चापके, सुभाष दायमा, प्रदीप तायडे आणि विश्वजित भगत उपस्थित होते.उपस्थिताचे आभार अॕड. अप्पाराव यांनी मानले आणि धम्मसंगीतीच्या सभासदाची संख्या वाढविण्याचे आहवान केले.