बाभळी बंधारा पुर्ण क्षमतेच्या वर भरल्याने दोन दरवाजे उघडून पाणी तेलगंणात सोडले

34

🔸दशांश ५५ टीएमसी पाणी तेलगंणात सोडले

🔹बाभळी बंधा-याचे उपअभियंता ए.व्ही.पडवळकर यांची माहिती

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.2नोव्हेंबर):-येथुन जवळच असलेल्या धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार २९ आँक्टोबर रोजी त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत बंद करण्यात आले. उदघाटनापासुन बंधारा क्षमतेपेक्षा जास्त भरला असल्याने ३०,३१ आँक्टोबर व १ नोव्हेंबर असे तीन दिवस बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडून दशांश ५५ टीएमसी पाणी तेलगंणात सोडले असल्याची माहिती बाभळी बंधा-याचे उपविभागीय अभियंता ए.व्ही.पडवळकर यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार बाभळी बंधा-याचे चौदाही दरवाजे २९ आँक्टोबर रोजी बंद करण्यात आले. पण यावर्षी आँक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. त्यातच बंधा-याचे दरवाजे बंद केल्याने बँकवाँटरमुळे परिसरातील शेतीमध्ये पाणी जाऊन शेतीपिकांचे नुकसान होऊ शकत होते.गतवर्षी बँक वाँटरमुळे परिसरातील ३०० हेक्टर वरील शेतीपिकांचे नुकसान झाले होते. अशी परिस्थिती यावर्षी उदभवू नये म्हणून प्रशासनाने ३०,३१ आँक्टोबर व १ नोव्हेंबर रोजी बंधाऱ्याचे दोन दरवाजे तीन तास उघडून दशांश ५५ टीएमसी नदीपात्रात सोडले.

त्यामुळे बंधा-याच्या बँकवाँटरमुळे शेतीपिकांचे होणारे नुकसान यावर्षी टाळले आहे.बाभळी बंधा-यात ३३५ इतकी पाणीपातळी होती.त्यामुळे परिसरातील शेतीपिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नांदेड पाटबंधारे विभागाने ती ३३३ लेवल इतके येईपर्यंत पाणी तेलगंणात सोडण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय अभियंता ए.व्ही.पडवळकर यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार बंद करण्यात आलेले दरवाजे बाभळी बंधारा उदघाटनापासुन पहिल्यांदाच क्षमतेपेक्षा जास्त भरल्याने उघडावे लागले आहेत.यावर्षी परतीच्या पावसाने व जायकवाडी प्रकल्पातुन पाणी सोडण्यात आल्याने बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. दरवाजे बंदमुळे परिसरातील शेतीपिकांचे नुकसान होऊ नये यासाठी दरवाजे उघडण्याची तारीख नसतानाही दरवाजे उघडून तेलगंणात पाणी सोडावे लागले आहे. अशी परिस्थिती आँक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे आली आहे.