अदखलपात्र व सौम्य गुन्हे दाखल असलेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामाहून घ्या

    35

    ?खासदार बाळू धानोरकर यांची राकेश सिग अध्यक्ष कोल इंडिया लिमिटेड यांच्याकडे मागणी

    ✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805

    चंद्रपूर(दि.2नोव्हेंबर):-चंद्रपूर, यवतमाळ येथे मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित केलेल्या आहे. परंतु किरकोळ गुन्हे दाखल असलेल्या प्रकल्पग्रस्तांना अद्यापही नोरकरीवर सामावून घेतलेले नसल्याचे शेकडो प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे उपजीविकेचे साधन हिरावल्या गेलेल्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गुन्हे दाखल असलेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेऊन हा लोकहितकारी प्रश्न त्वरित मार्गी काढण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी राकेश सिग अध्यक्ष कोल इंडिया लिमिटेड यांच्याकडे केली आहे.

    आपल्या भागात मोठ्या प्रमाणात शेती करण्यात येते. परंतु कोळसा खाणी आल्यानंतर अनेक कुटुंबाच्या शेतजमिनी या प्रकल्पात गेल्या आहे. त्यामध्ये अनेकांना फक्त काही ठराविक रक्कम मिळाली आहे. नोकरी देत असताना प्रकल्पग्रस्तांवर गुन्हे दाखल असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे त्यांना अद्याप देखील नोकरी मिळालेली नसून शेकडो प्रकल्पग्रस्त अद्यापही नोकरीपासून वंचित आहे.एखाद्या व्यक्तीवर न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास वंचित करणे समजण्या जोगे आहे.

    गुन्हेगारी प्रकरणामध्ये आरोपीच्या विरोधातील गुन्हे बघितल्या गेले पाहिजे. त्यामध्ये ३०२,३७६ या गंभीर गुन्ह्यातील आरोपीवर वेकोलिने कारवाई केली, तर हि योग्य बाब आहे. परंतु अदखलपात्र गुन्हे, छोटे गुन्हे यामध्ये प्रकल्पग्रस्त नोकरीपासून वंचित ठेवणे हि बाब या प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करणारी आहे.

    महत्वाची बाब म्हणजे गुन्हे दाखल असलेली व्यक्ती कोल इंडिया येथे नोकरीवर घेतात. तिथे सक्ती करण्यात येत नाही. परंतु वेकोलि मध्ये कोणत्या आधारे हा नियम लागू करण्यात आला आहे. असा प्रश्न देखील खासदार बाळू धानोरकर यांनी विचारला आहे.

    प्रकल्पग्रस्तांना रोजगारापासून वंचित ठेवणे हि बाब गंभीरआहे. मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळत नसल्यामुळे कुटुंब उघड्यावर पडत आहे. त्यामुळे गुन्हे दाखल असलेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेऊन हा लोकहितकारी प्रश्न त्वरित मार्गी काढण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.