सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण थांबवून एमपीएससी व तत्सम परीक्षा तातडीने घ्या

    93

    ?रोजगार संघ तालुका ब्रह्मपुरी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    ब्रम्हपुरी(दि.2नोव्हेंबर):- सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण करण्याचे अत्यंत अन्यायकारक धोरण महाराष्ट्र शासनाने अंगी कारल्याचे दिसून येत आहे ज्या सरकारी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण लागू करण्यात आले आहे त्या नोकऱ्यांचे खाजगीकरण करून मागासवर्गीयांच्या आरक्षण संपुष्टात आणण्याचे धोरण आपल्या सरकारने हाती घेतल्याचे दिसून येत आहे.

    याचाच भाग म्हणजे नोकरीतील अनुशेष न भरणे, नवीन पदनिर्मिती न करणे, मंजूर पदे भरण्यास स्थगिती देणे, एमपीएससी व तत्सम परीक्षांचे वेळापत्रक लावूनसुद्धा परीक्षा रद्द करणे यासारखे अन्यायकारक धोरण राबवणे सुरू असल्यामुळे राज्यातील लाखो उमेदवारांचे भविष्य उध्वस्त होत आहे. कोरोनाचे नाव समोर करून अनेक सरकारी नोकर्‍यांवर बंदी आणण्यात आलेली आहे.

    त्यामुळे तरुणांचे बेरोजगारीचे प्रश्न निर्माण होत आहे जागा निघत नसल्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार झालेले आहे राज्यात नीट ,जे इ इ व विद्यापीठांच्या परीक्षा शासनाच्या आदेशानुसार पार पडल्या आहेत या परीक्षा घेण्यास सरकारपुढे कुठलीही अडचण निर्माण झाली नाही मग एमपीएससी व तत्सम परीक्षा घेण्यास अडचण का बर निर्माण होत आहे असा प्रश्न राज्यातील युवक विचारीत आहेत महामारी चे अनाकलनीय कारण सांगून विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त करीत आहेत.

    असा युवकांकडून आरोप होत आहे सदर अन्यायकारक धोरणामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये संतप्त भावना निर्माण होत आहे यावर उपाययोजना न केल्यास युवकांचा उद्रेक होण्याचा धोका निर्माण होत आहे तेव्हा सदर खाजगीकरण थांबवून नियोजित परीक्षा व पदभरती तातडीने करण्यात यावी अशी मागणी ब्रह्मपुरी तालुका रोजगार संघाद्वारे करण्यात आली आहे अन्यथा या विरोधात प्रचंड आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विद्यार्थ्यांद्वारे देण्यात आलेला आहे.

    सदर निवेदन देताना ब्रम्हपुरी तालुका रोजगार संघाचे अध्यक्ष प्रा लक्ष्मण मेश्राम, मार्गदर्शक प्रा नामदेवराव जेंगठे सर, प्रा बालाजी दमकोंडवार सर ,मा.रडके सर , खुशाल वाकडीकर ,श्याम मंडपे, प्रज्वल वाघमारे,कुंदन लांजेवार,तुषार पगाडे,गौरव ठोंबरे, विपाली येडेवार,ज्योती राऊत ,प्रियंका सेलोटे,शालू उपरिकर व इतर विध्यार्थी हजर होते.