आजणसरा येथे अँलोपँथिक दवाखान्याचे आमदार कुणावार यांचे हस्ते लोकार्पण

    46

    ✒️सचिन महाजन(प्रतिनिधी हिंगणघाट)मो:-9765486350

    हिंगणघाट( 2नोव्हेंबर):-आजणसरा हे संत भोजाजी महाराजांच्या पुरण पोळी स्वयंपाकासाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने, दररोज हजारो भाविक मंदिरात स्वयंपाक घेऊन येत असतात,चुलीवर स्वयंपाक केला जात असल्याने नेहमी किरकोर तर कधी गंभीर स्वरूपाचे अपघात होत असतात,परंतु इथे कोणत्याही प्रकारची शासकीय आरोग्य सेवा नसल्याने भाविकांसह गावकऱ्याना सुद्धा उपचारासाठी वडनेर किंवा हिंगणघाट ला जावे लागत होते.

    तसेच भोजाजी महाराज संस्थान कडून वृद्ध व निराश्रितांसाठी सुरू करण्यात आलेल्या आनंद आश्रम मध्ये असलेल्या निराश्रीतांच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला होता,त्यामुळे हिंगणघाट पं. स.सदस्य व भोजाजी महाराज संस्थान चे अध्यक्ष डॉ.विजय पर्बत व सरपंच श्रावण काचोले यांनी जी.प.आरोग्य विभागाकडे एलोपँथिक दवाखाना सुरू करण्याबाबत सतत पाठपुरावा केल्याने, 2 नोव्हेंबर पासून रुग्णांच्या सेवेसाठी दवाखाना सुरू करण्यात आल्याने इथे येणाऱ्या भाविक भक्तांसह गावकरी व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    आरोग्य केंद्रात डॉ.भारती गुरवे यांची निवासी आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ति करण्यात आली आहे,आरोग्यकेंद्राचे लोकर्पन आ.समीर कुणावार यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी कुचेवार जी.प.सदस्य ज्योत्सना सरोदे,पं.स.सदस्य डॉ.विजय पर्बत माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिगांबरजी येडे डॉ.संदीप लोंढे
    डॉ.शिल्पा राठी सरपंच श्रावणजी काचोले उपसरपंच नरेंद्र पाटील ग्रा.प.सचिव चंद्रभान सायंकार कृषि अधिकारी नीलेश सुपारे नायब तहसीलदार पठाण सुधीर वानखेड़े आरोग्य सेविका लता ठाकरे आशासेविका उमाटे मंगला भोंगाडे सारिका थुल जयश्री राम पाटिल बबनराव साटोने राजेंद्र ढवले संजय थुल नामदेव गाढ़वे धनराज मेश्राम सामाजिक कार्यकर्ते संजय कोसुरकर यांच्यासह गावकऱ्यांनी उपस्थिती होती.