रुई येथे कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी

116

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.3नोव्हेंबर):-बीड येथील वडवणी तालुक्यातील रुई पिंपळा गावी कोजागिरी पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले यावेळी तथागत गौत्तम बुध्द आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन सामुहिक बुध्द वंदना घेण्यात आली. 

   सर्वप्रथम बुध्द आणि आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाउपध्यक्ष आण्णासाहेब मस्के,बहुजन विकास मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब वाघमारे , भालेराव मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब साळवे,,धनगर कृती संघर्ष समितीचे दत्ता वाकसे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.

यावेळी सदाशिव आंधळे,दादा शेख,अविनाश गवळी,मनोज गवळी,दलीत गवळी .रमेश गवळी,तुकाराम गवळी,गोरख आंधळे,बालाजी आंधळे विकास आंधळे.यांच्यासह आदी जण उपस्थित होते.तर समाज बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.बुध्द वंदना,बुध्द गाथा नंतर खिरीची वाटप करण्यात आले.