ओबीसी व्हीजेएनटी प्रवर्गाच्या संविधानिक न्याय मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन

24

🔹ओबीसी समाजातील संघटनांनी, बारा बलुतेदार संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे.-प्रा. विजय मुंडे ,मा.विलास ताटे

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.3नोव्हेंबर):-ओबीसी व्हीजेएनटी प्रवर्गाच्या संविधानिक न्याय मागण्यांसाठी आज दि 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा. तहसील कार्यालयासमोर ओबीसी व व्हीजेएनटी तसेच बारा बलुतेदार संघटनांच्यावतीने महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा .टी.पी. मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ओबीसी विमुक्त भटक्या जाती व जमाती व विशेष मागास जातीचे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत याच प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी तहसील कार्यालया समोर व तहसीलदारांमार्फत सरकारला जाग येण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.

8 ऑक्टोबर 2020 रोजी राज्यातील सर्व तहसीलदारांना निवेदने देण्यात आलेली आहेत ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू केले असून ते वेगवेगळ्या मार्गाने जोपर्यंत ओबीसी चे सर्व प्रश्न सुटत नाही तोपर्यंत सुरूच राहणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 3 नोव्हेंबर 2020 रोजी परळी तहसील कार्यालयासमोर संघटनांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत.

निवेदनातील मागणीनुसार सण 2021 ची जनगणना केंद्र सरकार जातीनिहाय करणार नसेल तर महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात जातनिहाय जनगणना करावी , मराठा समाजाची ओबीसी करण करू नये कोणत्याही परिस्थितीत ओबीसी या प्रवर्गात मराठा जातीचा समावेश होऊ नये, पुढे ढकलण्यात आलेल्या सर्व भरती प्रक्रिया तसेच एमपीएससी व अन्य सर्व प्रकारच्या परीक्षा कोणाच्याही दबावाची परवा न करता ताबडतोब घेण्यात याव्यात.

शासकीय सेवा ओबीसीचा अनुशेष लवकरात लवकर भरण्यात यावा तसेच कोणत्याही कारणास्तव मेगा भरती न थांबता ती ताबडतोब सुरू करण्यात यावी आदीसह विविध 21 मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत शासनास देण्यात येणार आहे.

तरी ओबीसी व्हीजेएनटी ,बारा बलुतेदार संघटनांचे पदाधिकारी तसेच ओबीसीतील अठरापगड जातीतील सर्व नेते पदाधिकारी युवक महिला ज्येष्ठ नागरिक यांनी धरणे आंदोलनास ोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्‍हान प्रा. विजय मुंडे, मा. विलास ताटे, मा. सूर्यकांत मुंडे, मा. छत्रपती कावळे ,मा.श्याम गडेकर, मा. नवनाथ शिरसागर, मा .राहुल कांदे,मा. गफार भाई बागवान बबलू सय्यद, मा. किशोर जाधव ,मा .हनुमंत गुट्टे, मा. शिवा बडे आदीसह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.