बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे अनंतात विलीन

55

🔸खाकी वर्दीतील दर्दी कवी हरपला

✒️बाळासाहेब ढोले(विशेष प्रतिनिधी)मो:-7875157855

यवतमाळ(दि.4नोव्हेंबर):- जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील ह.मु. शेंबाळपिपरी येथील तसेच ईसापुर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतिष्ठित नागरिक , बौद्धाचार्य सदाशिवराव कांबळे यांचे द्वितीय सुपुत्र आणि उमरखेड पंचायत समितीमध्ये ग्राम विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले विजय कांबळे यांचे मोठे बंधू ,शिक्षक, कवी मनाचे , सुपरिचित असलेले बीड जिल्हा कारागृहाचे तुरुंग अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले.

संजय सदाशिवराव कांबळे यांचे दिनांक ३/११/२०२० रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने सायंकाळी ११ वाजता बीड येथील लोटस हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाची वार्ता मिळताच महाराष्ट्र कारागृहात शोकाकुल पसरला आहे.

तसेच पुसद तालुक्यामध्ये सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारा ,उमद्या मनाचा कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्यातून निघून गेल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पाठीमागे आई-वडील, दोन भाऊ , दोन बहिणी व पत्नी एक मुलगी ,एक मुलगा असा अपत्य परिवार आहे.