रयत शेतकरी संघटनेचे रेवकी जिल्हा परिषद सर्कल प्रमुख पदी कुंडलीक जाधव यांची निवड

31

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.4नोव्हेंबर):-रयत शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष अड. रविप्रकाश उर्फ बापुसाहेब देशमुख साहेब यांच्या प्रेरणादयाने देशमुख साहेबांचे हात बळकट व मजबूत करण्यासाठी रयत शेतकरी संघटनेचे काम पाहून प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडलिक उर्फ बाळराजे जाधव यांची सर्वानुमते रेवकी जिल्हा परिषद सर्कल प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे..

शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांच्या आदेशानुसार शेतकरी माय बापांच्या व सर्व सामान्य माणसाला अडचणी दूर करण्यासाठी जिवाचं राण करून शेवटच्या शेतकरी व सामान्य माणसापर्यंत पोहचण्याचे काम शेवटच्या क्षणापर्यंत करित राहिल असे कुंडलीक जाधव यांनी देखील म्हटले आहे..

जाधव यांना सर्व सामान्य माणसाची सेवा करण्यासाठी बळ मिळो. त्यांच्या कार्याला यश मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना. व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा…..