आमदार कुणावार यांनी बोंड अळीग्रस्त शेतीची केली पाहणी

30

🔹जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

✒️सचिन महाजन(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9765486350

हिंगणघाट(दि.4नोव्हेंबर):-तालुक्यातील पोहणा,वडनेर,सोनेगांव,फुकटा सर्कलमधील कपाशीचे बोंडअळीच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात सर्वेक्षण करण्याकरीता दोन दिवसांपूर्वी महसुल तसेच कृषी विभागाचे अधिकाऱ्यांसह आमदार समिरभाऊ कुणावार यांचा शेतीशिवारात पाहणी दौरा झाला.

याचा आढावा घेत त्यांनी जिल्हाधिऱ्यांकड़े नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी केली असून जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी यास मान्यता दिली.

हिंगणघाट तालुक्यातील ग्रामीण भागामध्येवडनेर,आजनसरा,फुकटा आणि पोहणा येथे अनेक ठिकाणी थेट बांधावर भेटी देऊन बोंडअळीचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या कपाशीची पाहणी केली.दिलेल्या भेटिमधे मोठ्या प्रमाणामध्ये कपाशी बोंड हे बोंडअळीच्या प्रादुर्भावाने ७० % सडले असल्याचे निदर्शनास आले असून उर्वरित ३०% बोंडेसुद्धा बोंडअळीने प्रभावित झाल्याचे दिसुन येत आहे.

त्यामुळे आता कपाशी संपूर्णतः नष्ट झाल्याचे दिसुन आले असून बळीराजा मात्र चिंताग्रस्त दिसुन येत आहे. शासनाने याची तात्काळ दखल घेऊन सरसकट पंचनामे करीत उध्वस्त झालेल्या बळीराजास आर्थिक मदत करावी.

शेतकऱ्यांनी उभ्या शेतात रोटावेटर फिरवला आहे. सोयाबीन पाठोपाठ आता कपाशीसुद्धा १००% हातून गेलेली आहे .पीडित शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करावी यासंदर्भात आमदार समीरभाऊ कुणावार यांनी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांना निवेदन दिले आहे .