विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे आसापूर स्मशानभूमीची मागणी

63

🔸जीवती तालुक्यात सुदामभाऊ राठोड यांचा लढा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

जिवती(दि.5नोव्हेंबर):- तालुक्यातील आसापुर ग्रामपंचायत मधील चार ही गावाला स्मशानभूमीची निर्मितीचे निवेदन देण्यात आले. सदर विषय याप्रमाणे, आसापुर ग्रामपंचायत मधील चार ही गावात अंतिम संस्कार करते वेळेस फार अडचण निर्माण होत आहे.

पावसाळ्यामध्ये प्रेत जळत नाही, म्हणून राकेल किवा टायर चा वापर करावा लागतो. राकेल किंवा डीझेल ज्वालंतशील पदार्थ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पेट घेते त्यामुळे जीवित हानी होऊ शकते.

त्यामुळे ग्रामीण भागात स्मशानभूमी असणे अत्यंत आवश्यक आहे. या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देवून स्मशानभूमी निर्मितीस मान्यता द्यावी, अशी विदर्भ राज्य आंदोलन समिती चे तालुका अध्यक्ष सुदामभाऊ राठोड व सह कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली.