हिंगणघाट शहरात दामीनी पथक (चार्ली पथक) सुरु करण्यात यावे

34

🔸पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांचेकडे निवेदनातुन मागणी

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(5दि.नोव्हेंबर):- शहरात टवाळखोरीचव प्रमाण वाढत चालल आहे, मुख्य प्रकारे टवाळखोरीचे प्रमाण बसस्टॉप ,नंदोरी चौक,कलोडे चौक, बिडकर कॉलेज, व महाविद्यालय, विद्यालय जवळपास घटना घडत आहेत.

याचं वर्षी शहरात अंकिता जळीतकांड प्रकरण झालं आहे याचं घटनांना लक्षात घेता शहरात दामीनी पथक ची गरज आहे यावर चर्चा करण्यात आली.

या विषयावर लवकरात लवकर निर्णय घेऊन दामीनी पथक (चार्ली पथक)गावात सुरू करण्यात यावे अशी मागणी पोलीस निरीक्षक यांना करण्यात आली.तसेच पोलीस निरीक्षक साहेबांच स्वागत महाराष्ट्र दिन आयोजन समिती व्दारा करण्यात आले…

निवेदन देतानां प्रतीक्षाताई भास्कर थुटे,रानीताई साखरकर,
महाराष्ट्र दिन आयोजन समितीचे अध्यक्ष सनी ओमप्रकाश बासनवार अक्षय थुटे, अभिजित नरवडे,विशाल पराते संकेत नंदुरकार उपस्थित होते.