वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे महाराज या महापुरुषांच्या प्रतिमा मांडवा ग्रामपंचायत कार्यालयाला भेट

39

🔹ग्राम परिवर्तन समिती मांडवाचा उपक्रम

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.5नोव्हेंबर):-ग्राम परिवर्तन समिती मांडवा यांनी मानवतेचे महानपुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५२ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ५/११/२०२० रोजी ग्रामपंचायत कार्यालय मांडवा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व थोर समाज सुधारक ,वैराग्यमूर्ती गाडगे महाराज या महापुरुषांच्या प्रतिमा ग्रामपंचायत कार्यालय मांडवाला भेट देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या वेळी कार्यक्रमास ग्रामसचिव मांडवा मंगेश देशमुख, पोलीस पाटील दत्तराव पुलाते, माजी सरपंच शिवाजी चिरमाडे, विदर्भ युवा मृदुंग सम्राट,ह.भ.प.अजिंक्य महाराज पुलाते मांडवेकर, ग्रामपंचायत कर्मचारी शेषेराव राठोड, प्रदुम्न आबाळे, इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती थोर समाज सुधारक गाडगे महाराज या महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.त्यानंतर प्रमुख उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा भेट देण्यात आल्या.यावेळी विदर्भ युवा मृदंग सम्राट , ह.भ.प. अजिंक्य महाराज पुलाते मांडवेकर यांनी मानवतेचे महानपुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

यावेळी ग्राम परिवर्तन समिती मांडवा अध्यक्ष गोपाल मंदाडे, उपाध्यक्ष अंकुष घावस, रवि चवरे, प्रवीण धाड, रवि लांडगे, बजरंग राठोड , ओमप्रकाश घुक्से, बाळासाहेब ढोले तसेच ग्राम परिवर्तन समितीच्या ईत्यादी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.