ज्ञानदीप अकॅडमी पुसद तर्फे आयोजित सत्कार समारंभामध्ये पुसद च्या मिल्खा वर 52000 रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव

40

🔸उत्कृष्ट धावपटू शंकर धुळे यांच्या सत्कार

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.5नोव्हेंबर):-स्थानिक ज्ञानदीप अकॅडमी पुसद तर्फे पुसद चा मिल्खा म्हणून प्रसिद्ध असलेल्या विदर्भ रनिंग चॅम्पियन शंकर धुळे यांचा सत्कार समारोह आयोजित करण्यात आला होता.अतिशय हालाखीची आणि प्रतिकूल परिस्थिती असताना देखील शंकर ने अनेक मॅरेथॉन स्पेर्धेत पारितोषिक पटकावले आहेत तसेच नागपूर येथे आयोजित विदर्भ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 42 किलोमीटर धावून प्रथम क्रमांक देखील पटकावला आणि पुसदच्या क्रीडाविश्वात मनाचा तुरा रोवला.

शंकर ला प्रोत्साहन देण्यासाठी व पुढील स्पर्धेसाठी आर्थिक अडचण जाऊ नये यासाठी ज्ञानदीप अकॅडमी चे संचालक कौस्तुभ धुमाळे यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आणि एकच दिवसात आयोजित झालेल्या कौतुक सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहून शंकर धुळे यांना प्रोत्साहनपर 52000 रुपयांची रोख रक्कम भेट दिली.

मुंबई येथे होणाऱ्या जागतिक स्तरातील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च डॉ अमोल मालपाणी यांनी देण्याचे जाहीर केले तसेच पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद भाऊ मैंद यांनी शंकर धुळे यांना भारती मैंद पतसंस्थेमध्ये नोकरी देण्याचे जाहीर केले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

याशिवाय ज्ञानदीप अकॅडमी, पुसद तर्फे 5001,जेट किड्स इंटरनॅशनल स्कुल, पुसद तर्फे 5001,माउंट लिटेरा झी स्कुल तर्फे5001, विशाल घाटे तर्फे 3001,समीर गवळी तर्फे 2500,भीमा हाटे स्मृती प्रित्यर्थ5001,माणुसकीची भिंत तर्फे 2001केसरी युवा संघटना, पुसद तर्फे 2500,ग्रामगीताचार्य श्री गणेश धर्माळे तर्फे 2001,दिवंगत माजी सैनिक चंद्रकांत कांबळे स्मृतिप्रीत्यर्थ राहुल कांबळे तर्फे 2001,कु मान्यता देशमुख तर्फे 1001,श्री संदीप जाधव सर गहुली तर्फे 1001,संदेश पांडे तर्फे 1001,विष्णू गवळी सर तर्फे 1001,इमरान खान SA रेडियम तर्फे 1001, रणजित सांबरे तर्फे 1001असे अनेक हाथ शंकर च्या मादीतला समोर आले.

कार्यक्रमाच्या प्रास्तविक मध्ये कौस्तुभ धुमाळे यांनी शंकर धुळे बद्दल माहिती दिली आणि शनकर चे ओलंपिक मध्ये गोल्ड मेडल मिळविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुसद मधील तिन्ही आमदारांना शासनाकडून मदत करावी अश विनंती केली कार्यक्रमाचे संचालन ग्रामगीताचार्य गणेश धर्माळे यांनी केली तर आभार राहुल पडगीलवार यांनी मानले.