शेतकऱ्यांच्या खात्यात सोमवारपासून अतिवृष्टीची रक्कम जमा होणार

31

🔸पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली माहिती

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.7नोव्हेंबर):-राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या व घरांच्या नुकसानीची भरपाई येत्या सोमवारपासून दिली जाईल, अशी माहिती पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्याने अतिवृष्टीच्या भरपाईसाठी एकूण 10 हजार कोटींची तरतूद केली असून शेती व शेतघरे, पशुधन, मृतांचे वारस यांच्यासाठी त्यापैकी 5 हजार 500 कोटी वापरण्यात येणार आहेत.

🔸पत्रे पाठवली:- तब्बल 38 हजार कोटी रुपये राज्याचे केंद्राकडून येणे बाकी आहे. केंद्र सरकारला आम्ही अतिवृष्टीच्या भरपाईचे पैसे देण्यासंदर्भात तीन पत्रे पाठवली आहेत.

🔹मदत:- आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अतिवृष्टीतील सर्व आपदग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवू, असे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

🔸भरपाई:- 10 हजार रुपये जिरायत, बागायतच्या नुकसान भरपाईसाठी प्रति हेक्टरी 25 हजार रुपये तसेच पशुधन, शेतघरे व मृतांच्या वारसांना भरीव मदत करण्यात येणार आहे.