शासकीय कापुस खरेदी तात्काळ सुरू करा – राम नवले पाटील

48

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधमो:-9075913114

गेवराई(दि.7नोव्हेंबर):-ओल्या दुष्काळाने शेतकरी परेशान झालेला असताना थोडाफार शिल्लक राहीलेला कापुस शेतकरी कसाबसा वेचून घरी आणत असताना त्यास विक्री करण्यासाठी शासनाची कोणतीही बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकरी खासगी व्यापाऱ्यांच्या घशात कष्टाने पिकवलेलं पांढरं सोनं घालत असुन खासगी व्यापारी शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात लुट करत आहेत, त्यामुळे शासनाने तात्काळ शासकीय कापुस खरेदी सुरू करावी अन्यथा शेकडो शेतकऱ्यांसह आंदोलन करणार.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्व पिके अवकाळी पावसाने वाहुन गेलेले असुन शेतकरी पुर्णतः उध्दस्त झालेला आहे. *सोयाबीन जागेवरच उगवले, बाजरीला झाडावरच कोंब फुटले, तुर पावसाने उधळुन गेली, फुटलेल्या कापसाच्या जागेवरच वाती झाल्या तर बोंड सडुन गेली अश्या परिस्थितीत शेतकरी पुर्णतः कोलमडून पडलेला असताना केंद्रशासनान शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला तयार नाही.

राज्य सरकारने शेतकऱ्याला तुटपुंजी मदत जाहीर केली असली तरी ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी दोन महिने लागनार आहेत, शेतकऱ्याने पिकावर भरलेला पिक विमा मंजूर करायला कंपन्या आणि शासन तयार नाही अशा परिस्थितीत थोडाफार राहीलेला कापुस शेतकरी वेचून आपल्या घरी घेऊन आला असताना त्यास विक्री करण्यासाठी कुठलीही शासकीय बाजारपेठ उपलब्ध नसल्याने खासगी व्यापारी शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात लुट करत आहेत.

शेतकरी कोलमडून गेलेला असताना देखील शासन कापसाची शासकीय खरेदी करायला तयार नाही ही बाब गंभीर स्वरुपाची असुन शासनाने तात्काळ कापसाची खरेदी सुरू करावी अन्यथा रयत शेतकरी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा बीड तालुका अध्यक्ष राम नवले यांनी केला आहे.