नवजात बाळाचे प्राण वाचवण्यात डॉ. विजय लाड यांना आले यश

99

🔹डाँ. लाड यांचेवर आभाराचा वर्षाव

✒️अतुल बडे(विशेष प्रतिनिधी)मो:-9096040405

अंबेजोगाई(दि.7नोव्हेंबर):-900 ग्राम वजन आणि श्‍वास घेण्यास होत असलेल्या त्रासामुळे प्रकृती गंभीर असलेल्या नवजात बाळाचे प्राण वाचवण्यात लाड बालरूग्णालयाचे डॉ. विजय लाड यांना यश आले आहे. सगळ्यात कमी खर्चात बाळाचा जीव वाचल्यामुळे नातेवाईकांनी त्यांचे आभार मानले.जागतिक महामारीच्या काळात देखील अंबाजोगाई येथील लाड बालरूग्णालय 24 तास रूग्णांसाठी खुले आहे.

बाळाचे आई-वडील केज येथील रहिवासी असून . सरकारी दवाखान्यांमध्ये सिजर झालं पण बाळाची वजन अतिशय कमी असल्यामुळे व कमी महिने भरल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक होती त्याच्या श्वासालाही त्रास होऊ लागला त्यामुळे बाळाला लाड हॉस्पिटल येथे नेण्यात आलं. झालेल्या बाळाचे वजन अवघे 900 ग्राम होते. वजन एक किलोपेक्षाही कमी अन् त्यातच बाळाला श्‍वास घ्यायला त्रात होता.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सदरील बाळावर उपचार करण्यासाठी अडचणी येत होत्या. बाळाची प्रकृती चिंताजनक रूग्णालयात दाखल करून घेण्याचे धाडस कोणीही दाखवत नव्हते. या परिस्थितीत नातेवाईकांनी विश्‍वास दाखवला आणि डॉ. विजय लाड यांनी नाजुक प्रकृती असलेल्या त्या बाळाला लाड बाल रूग्णालयात दाखल करून घेतले. श्‍वास घ्यायला त्रास होत असल्याने सुरूवातील त्या बाळाला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले.

दरम्यान बालरोगतज्ञ डॉ. विजय लाड यांनी घेतलेल्या परिश्रमाला यश आले असून बाळाचे वजन वाढले आहे. व्हेंटीलेटर काढून टाकण्यात आले असून त्याला आईचे दुध देण्यात येत आहे. प्रकृती ठणठणीत होताच त्याला सुटी देण्यात आली. अगदी अल्पदरात बाळ व्यवस्थित झाल्यामुळे बाळाच्या नातेवाईकांनी डॉ. लाड यांचे आभार मानले आहेत.

बाळाच्या आईचे नाव मनीषा मैंद राहणार मैंदवाडी तालुका केज जिल्हा बीड आहे..