झाडी बोली साहित्य मंडळातर्फे विलास निंबोरकर सत्कार

    63

    ✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    गडचिरोली(दि.7नोव्हेंबर):- राणी दुर्गावती हायस्कूल गडचिरोली येथील सहायक शिक्षक विलास निंबोरकर यांचा झाडीबोली साहित्य मंडळाच्या शाखेतर्फे वतीने नुकताच परिश्रम भवनात सत्कार करण्यात आला. राणी दुर्गावती हायस्कूल येथील शिक्षक म्हणून सेवा दिलेले श्री. निंबोरकर नुकतेच नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. शिकविण्याचे पवित्र काम करता करता त्यांनी सामाजिक भान जपत अनेक सामाजिक संघटनात राहून सेवाकार्य काम करीत आहेत.

    ते झाडीबोली साहित्य चळवळीचे सक्रीय कार्यकर्ते असल्याने त्यांचा मंडळाच्या वतीने नुकताच शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत लेनगुरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, ज्येष्ठ कवयित्री सौ. कुसुमताई अलाम हे उपस्थित होते.

    तसेच याप्रसंगी कवी विनायक धानोरकर, भोजराज कान्हेकर, प्रमोद राऊत , मारोती आरेवार ,जितेंद्र रायपुरे आदी उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरानी विविध संघटनेच्या माध्यमातून करीत असलेल्या त्यांच्या कार्याचा गौरव केला. सेवा निवृत्तीनंतरसुध्दा अधिकाधिक कार्य घडत राहो अशा शुभेच्छा दिल्यात.

    सेवानिवृत्तीनंतरही माझे सामाजिक परीवर्तनाचे कार्य यापुढेही प्रामाणिकपणे सुरू राहील आणि सर्व समन्वयातून त्या कार्यास गती देऊ , असे सांगितले.याप्रसंगी जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवण्यात येऊन तिची अंमलबजावणी कडक करण्यात यावी , असा ठराव मंडळाच्या वतीने एकमताने घेण्यात आला.तसेच दिवंगत माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.टी.मसराम यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.