दिवाळीची सुट्टी कमी करणाऱ्या आणि 5०टक्के उपस्थिती बंधनकारक करणाऱ्या शासन निर्णयाची शिक्षक भारती चंद्रपूरने केली होळी

33

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.7नोव्हेंबर):-5 नोव्हेंबर २०्२० आणि २9 ऑक्टोंबर २०२० रोजी शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या निर्णयाची होळी शिक्षकभारती चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष श्री. भाष्कर बावणकर यांचे नेतृत्वात केली .

मा.आमदार कपिलजी पाटील , संस्थापक शिक्षक भारती संघटना , श्री. राजेद्र झाडे राज्य उपाध्यक्ष , श्री. संजय खेडीकर राज्य संघटक, श्री. भाऊसाहेब पत्रे विभागीय अध्यक्षभाऊराव पत्रे, श्री. सुरेश डांगे विभागीय सरचिटणीस नेतृत्वाने दिलेल्या आव्हानाला साथ देत , चंद्रपूर जिल्हा शिक्षक भारतीने शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या निर्णयाची होळी केली.

या प्रसंगी भाष्कर बावणकर जिल्हाध्यक्ष , किशोर हजारे जिल्हा मार्गदर्शक, मोहन दोडके , पुरूषोत्तम गायकवाड , माधव पिसे , प्रविण घ्यार सोबत मोठया प्रमाणात शिक्षकवृंद उपस्थित होते.