माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा संयुक्त समितीच्या सदस्यपदी नियुक्ती

32

✒️विजय तोकला(सिरोंचा प्रतिनिधी)मो:-9403477377

सिरोंचा(दि.7नोव्हेंबर):-महाराष्ट्र विधिमंडळ संयुक्त समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली असून अहेरी विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धर्मरावबाबा आत्राम साहेब यांना लोकलेखा समितीत सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे.2019 च्या विधानसभा निवडणुकीत माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी विक्रमी मतांनी विजयी मिळत राज्याचे लक्ष वेधले होते.

त्यानंतर प्रत्येक अधिवेशना दरम्यान सातत्याने गडचिरोली जिल्ह्यातील व अहेरी विधानसभा क्षेत्राचे प्रश्न मांडत सभागृहात आपली ओळख निर्माण केली.याचीच दखल घेत त्यांची आता विधिमंडळ लोकलेखा संयुक्त समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अति महत्त्वाच्या समिती मध्ये सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याने आपल्या जिल्ह्याकरिता आणि विधानसभा क्षेत्राचा विकासासाठी राज्य सरकार कडून निधी उपलब्ध करता येते.

या समितीला सभागृहात विशेष अधिकर आहे.त्यामुळे या महत्वाचे लोकलेखा समितीवर माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.