गंगाखेड विधानसभेचे आमदार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.रत्नाकर गुट्टे यांची दोन समितीवर नियुक्ती

31

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.7नोव्हेंबर):- महाराष्ट्र विधान मंडळाच्या वतीने विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीवर सदस्य म्हणून गंगाखेड विधानसभा आमदार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय रत्नाकर गुट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच आमदार निवास व्यवस्था समितीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे प्रमुख शांताराम मोरे असून सदस्यपदी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह अकरा जणांची समावेश आहे तसेच आमदार रत्नाकर गुट्टेयांची नियुक्ती विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती सदस्यपदी नियुक्ती केली आहे तसेच आमदार निवास व्यवस्था समिती पदी आमदार रत्नाकर गुट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या समितीचे प्रमुख राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे असून सदस्यपदी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्यासह 12 जणांचा समावेश आहे दोन्ही समिती नियुक्त झाल्याबद्दल सर्वत्र आमदार गुट्टे साहेबांचे अभिनंदन होत आहे.