आपका सोचना ही आपका भविष्य है !

34

” इंसांन भले ही शारीरिक रूप से विकलांग हो सकता है “,
पर अपने मानसिक तौर से नहीं “।इसलीये जिवन में कोई भी मुसीबत या आफत आये ,तो मायूस मत होना ,बस अपने मन को प्रभावित रखना ।

*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर* सद्यस्थितीत गावातील सर्व शाळकरी मुलं, कंपनी-कारखान्यात काम करणारी कामगार, लहान उद्योजक, पाणीपुरी वा समोसा विकून आपली उपजीविका भागविणारे दरिद्री कुटुंब, हाताला पाहिजे ते काम मिळत नसलेले बेरोजगार अशी ही सर्व मंडळी घरीच आहेत. त्यामुळे ह्या सर्व वर्गाची दिनचर्या विचारात घेतल्यास ग्रामीण भागात गावाकडे काम नसल्यामुळे *’ चाललं तसं चालू आहे ‘* अशी प्रक्रिया सुरू आहे. यांच्या वैचारिक बुद्धिमत्तेवर ताण दिसुन येत नाही आहे.

” आप ठहर जाएंगे तो चलेगा ,
मगर आपकी सोच नहीं ठहरनी चाहीये ,
क्योकी सोच ठहर गयी तो ,
जिंदगी बिना किसीं सोच के गुजर जायेंगी ।। “

” The Secret ” या पुस्तकांनुसार, तुम्ही जे मनात विचार करता तसे तुम्ही बनता . कोणतीही एकच गोष्ट मनात घेऊन वारंवार विचारविमर्ष करणे या प्रक्रियेला *आकर्षणाचा सिद्धांत* असे म्हणतात. तुमचे जीवन हे तुमच्या विचारांवर निर्भर असते. मात्र या आकर्षणाच्या सिद्धांतात सिद्धता साध्य करण्यासाठी वेळ हे फार महत्त्वाचे घटक आहे. या सिद्धांतात जादूची दुनिया म्हणजे “शाकालाका बुमबुम वा अक्कड बक्कड बंबे बॊ” या सारखे क्षणात तयार होणारे किंवा क्षणात प्रभाव पाडणारे जग नसते. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ लागत असते.

” एक बार जब आपकी सोच
निराशा से आशा मे परावर्तित हो जायेंगी
तो आपको अच्छे नतिजे मिलना भी शुरू हो जायेंगे ।”

किसींकी आदत बन जाओ
प्यासें खुद म खुद बन जाओगे

मन हे कधिच स्थिर नसते तर ते वाऱ्यासारखे वाहत असते. आज आता आपलं मन चंद्रपूर ला आहे तर केव्हाचं दिल्ली-मुंबई फिरून येईल, ह्याचा काही नेम नाही. आपण विचार चं करत नाही, की आपण काय करू शकतो. ज्यावेळी आपण खूप काही करू शकतो हे विचार करू त्यावेळी नक्कीच आपण स्वप्नांची पूर्तता करू शकतो. आपलं नाव, पैसा, गाडी-बंगला वा ओळख पटविण्यासाठी या आकर्षणाच्या सिद्धांताला फार महत्व आहे. आपली कोणतीही महत्वाकांक्षा आपण या सिद्धांताद्वारे मिळवू शकतो.

” जो उडणें का शोखं रखते है
वॊ गिरने का खोंफ नहीं रखते । “

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत तरुण युवा-पिढीचा विचार केल्यास बेरोजगारी दिसून येत आहे. ही तरुण पिढी अंशतः व्यसनाधीन झालेली आहे. तास न तास मोबाईल हाताळणे ( काही महिन्यापूर्वी तर पबजी आणि थ्री फायर ) असं सर्वाधिक मोठं व्यसनं युवापिढी मध्ये पहावयास मिळत होते . जर ह्याच तरुण पिढीला विचार करण्याचे संकेत मिळाले, तरुण पिढी विचार करू लागली किंवा योग्य ते मार्गदर्शन मिळु लागले आणि सद्विचारांची अमलबजावणी झाली तर नक्कीच हा भारत देश टॉप ५ मधून विकसित देश म्हणून ओळख निर्माण करील. फक्त विचाराने ही काही होत नाही तर त्यासाठी जिद्द, उमंग आणि मेहनतिची ही तडजोड असायला हवी.

” हौसलें के तर्कश में
कोशिश का वॊ तिर जिंदा रखो
हार जाओ चाहे जिंदगी मे सब कुछ
मगर फिर से जितने की
उम्मीद जिंदा रखो । “

शारीरिक , मानसिक शिवाय बौध्दिक ज्ञानामुळेच माणूस हा परिपूर्ण होऊ शकतो. आणि यासाठी गरज असते ती म्हणजे सकारात्मक विचारांची…

व्यक्तिपरत्वे विचारांमध्ये भिन्नता

विचारांमध्ये एवढी शक्ती असते की, ते आपण अंगिकरलोत तर वैचारिक बलाढ्य होऊ शकतो. कालांतराने परिस्थिती लक्षात घेतले असता, एक शेतकरी शेतात दिवसभर अंगमेहनत करतो. तर व्यावसायिक वा नोकरी पुरस्कृत, कार्यालयात किंवा संस्थेत काम-धंदा करतो. पण या दोघांची तुलना केली असता शेतकरी हा श्रमाने खूप जास्त मेहनत करतो तर व्यावसायिक कमी. दोघेही मेहनत करतात पण भिन्नता दिसून येत आहे. गरीब घराण्याच्या कुटुंबातील विचारसरणी आणि श्रीमंत घराण्याच्या कुटुंबातील विचारसरणी, लघु उद्योग वर्गातील लोकांची मानसिकता आणि नोकरी वर्गीय लोकांची मानसिकता यामध्ये खुप तफावत दिसून येते.

शाम सुरज को ढलना सिखाती है
शमा परवाने को जलना सिखाती है

गिरने वाले को होती है तक्कलिफ़
पर ठोकर ही इंसानं को चलना सिखाती हैं ।

आजतागायत पादचारी मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीचा विचार केल्यास , त्याला वाटते की माझ्याकडे सायकल असती तर आनंद झाला असता. त्याचऐवजी सायकल चालविणाऱ्या वर्गाचा विचार केल्यास , माझ्याकडे मोटार सायकल असती तर बरं झालं असत. त्या ही पुढे मोटार सायकल चालविणाऱ्या वर्गाचा विचार केल्यास , माझ्याकडे मारुती वा चार चाकी गाडी असती तर योग्य झालं असतं.

च्या ही पुढे मारुती कार वा चार चाकी वाहन चालविणाऱ्या वर्गाचा विचार केल्यास , त्यांच्याकडे BMW, मर्सिडीज गाडी असती तर ह्या वर्गाला आनंद झाला असता. या ही वर्गापेक्षा वरच्या वर्गाची Hierchey विचारात घेतले असता व्यक्तिपरत्वे विचार करण्याची क्षमता बदलत जाताना दिसते. यावरून हे लक्षात येईल की, प्रत्येक व्यक्तीच्या परिस्थितीनुरूप व्यक्तिपरत्वे विचारांमध्ये भिन्नता दिसून येते. यातील मुख्य विशेषांक म्हणजे प्रत्येक वर्गानी आपली लक्ष्मणरेषा ठरविलेली आहे, म्हणजे तो वर्ग वा तो समुदाय आपल्या विचारांची वाढ तेवढ्याच मर्यादेअंतर्गत करेल, असं आहे का ?

अपने हौसलों के बल पर
हंम अपनी प्रतिभा दिखा देंगे
भलें कोई मंच ना दे हमको
हंम मंच अपना बना लेंगे
जो केहते खुद को सितारा है
जगमगा कर उनके सामने ही ,
चमक कर देंगे उनकी फिकी
और सुरज खुद को बना लेंगे ।

◼️गरज आहे आता, ही लक्ष्मणरेषा ओलांडण्याची…

◼️गरज आहे आता, आपल्या जुन्या विचारांचे जंजिरे तोडून नवीन दारे उघडण्याची…

◼️गरज आहे आता, या बंद कारागृहातून बाहेर पडून सुटकेचा श्वास घेण्याची…

◼️गरज आहे आता, हा पिंजरा तोडुन आकाशात मनसोक्त फिरण्याची…

◼️गरज आहे आता या झोपलेल्या समाजाला जागे करण्याची…

◼️गरज आहे आता या राजकारणाला बळी न पडता स्वहक्क लढण्याची…

” ना मुश्कीले ना संघर्ष
तो क्या मजा है जिने में ,
आँधी तुफां भी थम जाये दोस्तहो
जब लक्ष बना हो सीने में…
जब लक्ष बना हो सीने में...”

सरतेशेवटी एवढंच…

लक्ष द्या
गोष्ट विचारात घ्या
गोष्टींचा लक्षपूर्वक विचार करा
स्वतःच्या मनाला विचारा
तुमची स्व:मते मांडा ,
मनाला अभिप्रेत करा, उत्साहित ठेवा
मेहनत करा
पुनः मेहनत करा…तोपर्यंत …जोपर्यंत तुम्ही महत्वाकांक्षेची गरुडझेप घेत नाही…
आपले ध्येय गाठा, आपली ओळख बनवा…

यें आसमान का इशारा हैं
कल का सुरज हमारा है ।

इसलीये, ”आपका सोचना ही आपका भविष्य है”, क्यो की आप अपने जीवन में जैसे सोचते हो, वैसे ही बन जाते हो ।

✒️लेखक:-आकाश कांबळे(चामोर्शी,गडचिरोली)मो:-९०४९८१२६७३