सरपंचांचा दाखले देण्याचा अधिकार पूर्ववत करा – सरपंच अर्जुन मोहिते

33

🔸निवेदनाद्वारे केली मुख्यमंत्र्यांना मागणी

✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

खटाव(दि.8नोव्हेंबर):-सरपंच हा ग्रामव्यवस्थेचा कणा मानला जातो. सरपंच विविध प्रकारचे दाखले ग्रामस्थांना देत होते. पण आता शासन निर्णयानुसार ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा विविध दाखले देण्याचा अधिकार पूर्ववत करावा अशी मागणी सरपंच अर्जुन मोहिते यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केली आहे.

 निवेदनात पुढे म्हटले आहे, सरपंच आपल्या अधिकारात ग्रामस्थांना विविध प्रकारचे प्रशासकीय व इतर दाखले देत होते. मात्र कोरोना महामारीत शेतकरी, मजूर, विद्यार्थी व सामान्य लोकांना दाखल्यांऐवजी शासन निर्णयानुसार स्वयंघोषणापत्र करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मोठी धावपळ करत दूरच्या गावाला जावे लागत आहे. कोरोना संकटात प्रवासाच्या समस्यां आहेत. लोकांचा वेळ वाया जात असूना त्यांना आर्थिक झळ बसत आहे. कोरोना काळात शासनाने दिलेत आदेश ग्रामपंचायतीने पाळले आहेत.

पण सर्वसामान्य लोकांना अडचणीत टाकणारे निर्णय संदर्भात विचार व्हायला पाहिजे.त्यामुळे ग्रामपंचायतींच्या सरपंचांना पूर्वीप्रमाणे विविध दाखले देण्याचा अधिकार द्यावा. त्यामुळे निश्चितपणे सरपंच पदाला न्याय मिळेल. तसेच शेतकरी, मजूर व विद्यार्थी यांना आपल्या सरकारकडून न्याय मिळाल्याची भावना निर्माण होईल.