हिंगणघाट येथे भरदिवसा मोठी चोरी

51

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.9नोव्हेबर):- शहरातील मोहता म्युनिसिपल हाइस्कूल परिसरातील कोठारी काम्प्लेक्समधे रविवार दिनांक 8 नोव्हेंबर भरदिवसा हुरकट यांचे फ्कलैटमधे चोरीची मोठी घटना घडली. यावेळी चोरट्यांनी चांदीसोन्याचे दागिने,डायमंडचे कड़े,१५ हजार रोख रक्कम इत्यादिसह सह सुमारे ४५ लाखांचा ऐवज पळविण्यात आला.प्राप्त महितीनुसार श्रीमती ताराबाई गोविंद हुरकट या आपला मुलगा हरीश,सुन वैशालीसह काळ्या सड़केवरील कोठारी कॉम्प्लेक्समधे दुसऱ्या माळ्यावरती फ्लैटमधे राहतात.

त्यांचे सुनेच्या नातेवाईकाचे नागपुर येथे निधन झाले असल्याने त्या मुलगा व सुनेसह आज सकाळी ११ वाजता नागपुरला गेले होते.भरदिवसा दुपारी १२ वाजताचे दरम्यान एक चोरटा बिल्डिंग मधे फ्लैटजवळ गेला,तेथे अशोक तोमर नावाचा व्यक्ति राहतो काय असे तेथे राहणाऱ्या एका महिलेस विचारले,त्या महिलेने संशयित इसमास तोमर येथे रहात नसल्याने जाण्यास सांगितले व ती महिला आपल्या कामासाठी निघुन गेली.

या दरम्यान अंदाजे २५ वर्षे चोरट्याने पुन्हा तेथे जाऊन फ्लैटचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश मिळविला.घरातील आलमारीतील लॉकरमधे ठेऊन असलेला ७५० ग्राम सोन्याचे दागिने,दोन किलो चांदी,६ लाख,८० हजार रुपये कीमतीचे डायमंड कड़े तसेच १५ हजार रोख रकमेसह अंदाजे ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला.सदर युवकाने चोरी केल्याचे लक्षात येताच शेजारी महिलेने आरडाओरड केली परंतु चोरटा धावतपळत खाली उतरून रस्त्यावर पूर्वीपासूनच तैनात असलेल्या आपल्या सहकार्‍यांसह मोटरसायकलवरून पसार झाला.

फिंगर प्रिंट एक्सपर्ट,डॉग स्कोड इत्यादिसह एलसीबी चे वर्धाचे पीआय नीलेश ब्राह्मणे,पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर,ठाणेदार भानुदास पिदुरकर इत्यादिनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पोलिसांनी शहरात नाकेबंदी केली असून वृत्त लिहीपर्यंत चोरट्यांचा सुगावा लागला नाही.स्थानिक आमदार समिर कुणावार यांना माहिती मिळताच त्यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली.तसेच पोलिस अधिक्षक होळकर आले असतांना उपस्थित राहुन तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.