कुंडलवाडी येथील जिल्‍हा मध्यवर्ती बॅंकेने ग्राहाकांना एटी.एम.कार्ड चे वितरण केले

31

🔹बॅंकेने कोरोनाच्‍या काळात ७ कोटी ४८ लक्ष ११ हजार रुपयाचे शेतक-यांना अनुदान वाटप केले

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.9नोव्हेंबर):-येथील नांदेड जिल्‍हा मध्यवर्ती बॅंकेने सन २०१९ ते सन २०२० या काळात या शाखेच्‍या अंतर्गत असलेल्या शहरासह २९ गावाच्‍या शेतक-यांना कोरोनाच्‍या काळात ७ कोटी ४८ लक्ष ११ हजाराचे रुपयांचे अनुदान वाटप करुन बॅंकेच्‍या ग्राहाकांना ३६४ ए.टी.एम.कार्ड चे वितरण केले असल्‍याची माहिती बॅंकेचे शाखाधिकारी जी.डी.कदम यांनी दिली.

सन २०१६ मध्ये शाखेच्‍या एकुण ठेवी ०२ कोटी ७४ लक्ष होते ग्राहाकांना चांगली व तत्‍पर सेवा मिळत असल्‍याने अाता ०६ कोटी रुपयाच्‍या ठेवी वाढल्‍याचे शाखाधिका-यांनी सांगितले. बॅंकेतील एस.एस.ठाकुर, एस.जी.साखरे, बी.आर.अर्जूने, सतीष रत्‍नागिरे यांनी कोरोनाच्‍या काळातही बाधित शेतक-यांना शासन अनुदान वाटप करुन ग्राहाकांना तत्‍पर सेवा मिळत असल्‍याने या बॅंकेकडे ग्राहाकांचा कल वाढलेला दिसत आहे.