ओबीसींच्या विशाल मोर्चा ची ब्रम्हपुरी येथे बैठक

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.9नोव्हेंबर):- ओबीसींची जणगणना करण्यात यावी व लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लागु करावे या मागणीसाठी ओबीसी समाजाच्या वतीने संविधानदीनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखो ओबीसी बांधवांचा विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चाच्या नियोजनाची बैठक ब्रम्हपुरी येथे पार पडली.
या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी ओबीसी जनगणना समन्वय समीती चे बळीराज धोटे, माजी प्राचार्य भाऊराव राऊत, अँड. प्रशांत सोनूले, प्रा. नामदेव जेंगठे, मोंटु पिलारे हे होते.देशात मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसी समाजाला अजूनही लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत नसल्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात ओबीसी समाजाची प्रगती खुंटलेली आहे.त्यामुळे आता नाही तर, कधीच नाही अशी उद्घोषणा करत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवांचा संविधानदीनी २६ नोव्हेंबर ला काढण्यात येणाऱ्या लाखोंच्या मोर्चात ओबीसी बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.बैठकीला मोठ्या संख्येने ओबीसी तरुण उपस्थित होते.बैठकीचे प्रास्ताविक व संचालन राहुल मैंद यांनी केले.आभार गोवर्धन दोनाडकर यांनी मानले.