पुसद येथे साप्ताहिक समाज -मुद्रा चा प्रकाशन सोहळा

30

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.10नोव्हेंबर):-ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल येथे साप्ताहिक समाज-मुद्र या वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा पार पडला.

यावेळी मा.आमदार अॅड.निलयभाऊ नाईक ( विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य ), मा.डॉ.सौ.आरतीताई फुपाटे ( विदर्भ महासचिव – अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद ), मा.राजेश आसेगांवकर ( अध्यक्ष – बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणी पिंपळगाव ) , मा.ज्ञानेश्वर तडसे ( अध्यक्ष – विवेकानंद आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ ) , मा.पि.एस.झळके ( उपविभागीय अभियंता – सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद ) ,ज्येष्ठ पत्रकार मा. के.जी.चव्हाण सर ,ज्येष्ठ पत्रकार मा.प्रा.दिनकर गुल्हाणे सर, ज्येष्ठ पत्रकार मा.ललित सेता ,ज्येष्ठ पत्रकार मा.दिपक हरिमकर सर , यांच्या प्रमुख उपस्थितीत साप्ताहिक समाज-मुद्रा मुखपत्राचे संपादक मा.शंकर माहुरे , यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

त्याचबरोबर पुसद शहरातील व तालुक्यातील प्रिंट व डिजिटल मिडीयाचे इतरही नामवंत पत्रकार बंधु-भगिनी व प्रतिष्ठित नागरिक प्रकाशन सोहळ्याला हजर होते.