बंदीस्त सभागृहे तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम नियंत्रित स्वरुपात सुरु करण्याबाबत अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.11नोव्हेंबर):-कोरोना विषाणू (कोविड-19) या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणास प्रतिबंध करणे याकरीता जिल्ह्यात बंदिस्त सभागृहे/ मोकळया जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, दीपक सिंगला यांनी अटी व शर्तीच्या अधीन राहून बंदिस्त सभागृहे/ मोकळया जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम परवानगी दिलेली आहे.

कोविड-19 साथरोग अंतर्गत गडचिरोली जिल्हा सीमाक्षेत्रामध्ये (कंटेनमेंट झोन वगळून) जमावबंदी व टाळेबंदी संदर्भात बंदिस्त सभागृहे/ मोकळया जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम नियंत्रित स्वरुपात सुरु करण्यास दि. 09 नोव्हेंबर 2020 पासून सुरु करण्याची परवानगी दिली आहे.

तसेच सदरील आदेशाचे पालन न करणारी/ उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, दीपक सिंगला यांनी कळविले आहे.