बँड पथकांना अटी व शर्तीच्या अधिन राहून बँड वाजविण्याची परवानगी

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.11नोव्हेंबर):- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव बघता बँड पथकातील बँड धारक यांनी गर्दी न करता सामाजिक अंतर राखुन बँड वाजविणे बंधनकारक राहील. बँड पथकाचे मालकांनी सर्व सदस्यांचे थर्मल स्क्रीनिंग करुन नोंदी ठेवणे बंधनकारक आहे.

प्रत्येक कार्यक्रमात मास्क वापरणे बंधनकारक राहील तसेच सर्व साहित्य नियमित निर्जंतुकिकरण करुन घेणे बंधनकारक राहील.

ताप, सर्दी व खोकला वा कोरोना विषयक लक्षणे असलेल्या बँडधारकांस पथकात समाविष्ठ करु नयेत असे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, दीपक सिंगला यांनी कळविले आहे.