पत्रकारांसाठी ‘संविधान प्रचारक पत्रकार कार्यशाळा’ संपन्न

    47

    ✒️संजय कांबळे माकेगावकर(अहमदपूर प्रतिनिधी)मो:-9860208144

    अहमदपूर(दि.11नोव्हेंबर):-लोकमुद्रा संस्था व दैनिक प्रजापत्र यांच्या वतीने पत्रकारांसाठी संविधान प्रचारक कार्यशाळा झूम ऍपच्या माध्यमातून पार पडली. पत्रकारांना संविधानिक मूल्यांची ओळख व्हावी यासाठी लोकमुद्रा संस्था व दैनिक प्रजापत्र यांनी चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

    यामध्ये संविधान निर्मितीचा इतिहास या विषयावर प्रा. प्रकाश पवार, संविधानाची प्रास्तविका याविषयावर नागेश जाधव, न्याय-स्वातंत्र्य-समता -बंधुता याविषयावर विनिता सिंग यांनी मांडणी केली. समारोप सत्रात ‘संविधानिक पत्रकारिता’ या चर्चासत्रात जेष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली नितीन ब्रह्मे व अश्विनी सातव – डोके या पत्रकारांनी मांडणी केली. या कार्यशाळे मध्ये लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील सम्राट चे तालुका प्रतिनिधी संजय कांबळे माकेगावकर यांनी ही सहभाग नोंदविला होता.

    महाराष्ट्रभरातून 45 पत्रकार यात सहभागी झाले होते. कार्यशाळा यशस्वी पार पाडण्यासाठी दैनिक प्रजापत्र संपादक सुनील क्षीरसागर, संजय मालानी तर लोकमुद्रा संस्थेचे सागर भालेराव, कल्याणी माणगावे, रशीद माणियार, संदीप आखाडे यांनी विशेष मेहनत घेतली.
    शेवटी संविधान प्रचारक पत्रकार कार्यशाळा झाल्या वर सन्मान प्रमाणपत्र देण्यात आले….