बीड जिल्ह्याचे कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांना पुसद येथे श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन

27

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.11नोव्हेंबर):- तालुक्यातील फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना, विविध राजकीय ,विविध सामाजिक संघटना या क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांना तसेच उपासक-उपासिका यांना सुचित करण्यात येते की, राष्ट्रपती पुरस्कार विजेता, शिक्षक, कवी मनाचे, सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारा, उमद्या मनाचा कर्तव्यदक्ष अधिकारी ,बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचे दिनांक ३/११/२०२० मंगळवार रोजी दुःखद निधन झाले.

दि. १२/११/२०२० गुरुवार रोजी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसद यांनी कार्यक्रमाचे आयोजन पुसद येथील तहसील कार्यालय समोरील हुतात्मा स्मारक येथे सायंकाळी ठीक ५:३० वाजता केले आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसद यांनी केले आहे.