कोरपना येथे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर यांच्या वाढदिवसा निमित्य (१०१) एक से एक लीटर पौष्टिक दुधाचे वाटप

28

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

कोरपना(दि.12नोव्हेंबर):- बस स्थानक चौक व ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे एक से एक लीटर दुधाचे वाटप हंसराजजी भैया आहिर यांच्या वाढदिवसा निमित्त मोठया उत्साह हळदी युक्त पौष्टिक दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री नारायण हिवरकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलेे.

यावेळी प्रमुख उपस्थिती श्री विशाल गज्जलवार,श्री अरुण मरावी सरपंच, श्री कवडूजी जरीले, श्री शशिकांत आड़कीने, श्री विजय रणदिवे सरपंच श्री विजय पानघाटे, श्री ओम पवार युवा मोर्चा,श्रीदिनेश खडसे,श्री संजय ठाकरे,श्री सुधाकर मोड़क, श्री पद्माकर दगड़ी, श्री सुनील देकर, श्री शंकर चिंतलवार विनोद कुमरे,दिवाकर गेडाम आदि उपस्थित होते.

श्री नारायण हिवरकर भाजपा जिल्हाउपाध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात श्री हंसराज अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, सर्वसामान्य जनतेचे व शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी अनेक प्रकल्प ग्रस्तांना मदत मिळवून दिली व नोकरी पण मिळवून दिल्या शेतकऱ्यांच्या जमिनीला आठ,दहा ते पंधरा लाखांपर्यंत मोबदला मिळवून दिला व अनेक शेतकऱ्यांना,बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून दिल्या.

अनेक लोकोपयोगी कार्यक्रमात सहभाग घेउन आर्थिक मदत मिळवून दिली आजही त्यांना गोरगरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जाते अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले व भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या या प्रसंगी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.