नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अतुलकुमार दादाजी खोब्रागडे यांचा नामांकन अर्ज दाखल

32

🔸विदर्भाच्या प्रत्येक विद्यार्ध्याचे प्रश्न यापुढे कधीच दुर्लक्षित राहाणार नाहीत, अशी मी हमी देतो- खोब्रागडे

🔹ही निवडणूक आपण प्रचंड उर्जेने लढू आणि जिंकू

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.12नोव्हेंबर):-मागील दोन वर्षापासून नागपुर पदवीधर मतदार संघाच्या निवड़णुकीची तैयारी करत असलेल्या परिवर्तन पैनल ने या निवड़णुकीत अतुल दादा खोब्रागडे यांना अधिकृत उमेदवारी जाहिर केली आहे.

येत्या 01 डिसेंबर 2020 रोजी नागपुर पदवीधर मतदार संघात गोंदिया, भंडारा , नागपुर, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली या जिल्ह्यात मताधिकाराचा प्रयोग पदवीधर करु शकणार आहेत. परिवर्तन पैनल राजकीय पक्ष नाही. राजकारणाच्या नावावर समाजात नुसत्या थापा मारल्या जातात. अशा वेळेस सशक्त राजकारण, सुरळीत राज्य व्यवस्था चालवण्यासाठी सुशिक्षीत तरुणानी सहभाग घ्यावा हा परिवर्तन पैनलचा ऊद्देश्य आहे.

परिवर्तन पैनल ने या पूर्वी सिनेट निवडणुकीत आपले योगदान दिले आहे आणि डॉक्टर, वकील, इंजिनीयर, चार्टर्ड अकाउंटेन्ट, प्रोफ़ेशनल शिक्षण घेणारे विद्यार्थी, आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या यांच्या सहकार्याने यश संपादन केले आहे. नागपुर पदवीधर मतदार संघ निवडणुक आम्ही नक्कीच जिंकू असा आशावाद अतुलकुमार खोब्रागडे यांनी व्यक्त केला.