नितेशभाऊ मेश्राम यांचा वाढदिवस ज्ञानशाळा येथे साजरा

27

🔹अनावश्यक व व्यर्थ खर्चाला फाटा देत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9850801314

गोंडपीपरी(दि.12नोव्हेंबर):-उंदिरंगाव येथील शिल्पा वाकुडकर ने सुरू केलेल्या ज्ञान शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून नितीनभाऊ मेश्राम यांचा वाढदिवस त्यांच्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला.गोंडपीपरी राष्ट्रवादी कांग्रेस चे कार्याध्यक्ष नितीनभाऊ मेश्राम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्ञान शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले व ज्ञान शाळेतच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.हल्ली वाढदिवस म्हटलं की,मित्रमंडळी वआप्तजनाकडून शुभेच्छाचा वर्षाव होत असतोच!मग ओली वा सुखी पार्टी ठरलेली असतेच!

ह्या साऱ्या गोष्टी बाजूला सारून समाजाचे काही देणं लागत ,ह्या भावनेतून गोंडपीपरी तालुक्यातील नवेगाव येथील तालुका राष्ट्रवादी कांग्रेसचे कार्याध्यक्ष नितीनजी मेश्राम यांनी वाढदिवस दिनी अनावश्यक व व्यर्थ खर्चाला फाटा देत उंदिरंगाव येथिल शिल्पा वाकुडकर या युवतीने कोरोना संकटाने सर्व शाळा , कॉलेज बंद असताना आपल्या घरीच ज्ञान शाळा सुरू करून ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरू केले आहे.

त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना शालेय साहीत्याचे वितरण करण्यात आले व आनंदमय वातावरण असलेल्या ज्ञान शाळेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.या आदर्शवत उपक्रमात मेश्राम यांचे चाहते उपस्थित होते.