मिरगाव येथील पशुपालक व ऊस उत्पादक यांच्या नैसर्गिक आपात्तीचे नुकसान भरपाई देण्यात यावी-बाळराजे जाधव (गेवराई तालुका अध्यक्ष)

31

🔹तहसिलदार यांना निवेदन सादर

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114/ 9404223100

गेवराई(दि.12नोव्हेंबर):-मौजे मिरगाव येथील परतीच्या अवकाळी पावसामुळे बर्याच शेतकर्यांची नुकसान झालेली आहे. शेतकर्यांचे शेळ्या, गाई, म्हशी, बैल, या मरण पावल्या तर काही पुराच्या पाण्यात वाहून गेल्या तर काही जनवारे अज्ञात रोगाने दगावली, यांत पशुधनाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून सदर माहिती पशू वैद्यकीय अधिकारी, तलाठी, यांना कोणत्याही प्रकारची मागणी आल्याली नाही.

कारण कोरोनाची साथ व पावसाचा कहर, दळणवळण साध बंद असल्या कारणाने कोणाशीही संपर्क झाला नाही. तसेच मिरगाव येथील एक ऊस उत्पादक शेतकरी यांच्या ऊसाला आग दि- ९ /११/२०२० रोजी विजेच्या सर्किट मुळे पंधरा वीस एकर जळून खाक झाला आहे. आतापर्यंत शेतकरी राजा राब राब राबून शेवटच्या त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहे.

हातामधला ऊस उत्पादक गमावला आहे.. या शेतकर्यांना नुकसान भरपाई लवकरच देण्यात यावी. मिरगाव येथील ज्या शेतकर्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी म्हणून असे गेवराई तालुका अध्यक्ष बाळराजे जाधव यांनी तहसिलदार यांना निवेदन दिले आहे