चिमुरचे प्रशांत डवले यांचा विधानपरिषद पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत “अपक्ष” उमेदवारी अर्ज दाखल

30

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.13नोव्हेंबर):-महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक 2020 नागपुर विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक करीता प्रशांतभाऊ धनराजजी डवले यांनी दि.12 /11/20 गुरुवारला
विभागीय आयुक्त GPO चौक सिविल लाईन्स नागपुर, येथे उमेदवारी अर्ज दाखल केला.

असून चिमूर क्षेत्रातील पहिलेच पदवीधर मतदार संघाची आमदार पदाची निवडणूक लढणारे सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील उमेदवार म्हणून त्यांनी आपली एक वेगळीच ओळख निर्माण केल्याचे चित्र दिसून येत आहे, त्यांच्या कमी वयातील या हिंमतीला व धाडसाला सर्व नागपूर विभागातील जनतेने सॅल्युट केल्याची चर्चा जनसामान्यांत ऐकायला मिळत आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी नागपुर , वर्धा , चंद्रपूर , गडचिरोली, भंडारा व गोंदिया येथील संगणक परिचकल संघटना महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक तसेच चिमूर तालुक्यातील व नागपूर विभागातील बरेच मित्रमंडळी उपस्थित होते...