नायगाव (खै.) जि. नांदेड तालुक्यातील सरपंच पदांचे आरक्षण दि.१९ नोव्हेंबर रोजी

    40

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६०

    नांदेड(दि.13नोव्हेंबर०:-नायगाव (खै.) जि.नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत मधील सन २०२० – २०२५ या कालावधीत सार्वत्रिक निवडणूक होऊन गठीत होणाऱ्या ग्रामपंचायत च्या सरपंच पदाची आरक्षण सोडत दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, बाजूला हरण टेकडी येथे तहसीलदार श्री. गजानन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली जाणार आहे. सन २०२०-२०२५ करिता नायगाव खैरगाव तालुक्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ८० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत १९ रोजी होत असल्याने ग्रामीण भागात आता निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.

    आरक्षण सुटल्यानंतर राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. नायगाव खैरगाव तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतीचे राजकीय पुढाऱ्यांनी आतापासून लक्ष घातले आहे. पदवीधर निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. नायगाव तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,नागरीकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन नायब तहसीलदार श्री.डी.डी. लोंढे यांनी कळविले आहे.