निफाड तालुक्यातील नारायणगाव खेरवाडी ओझर मिग जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

44

✒️निफाड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

निफाड(दि.14नोव्हेंबर):-तालुक्यातील ओझर खेरवाडी या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे खड्डा कसा प्रकारे टाळावा, वाहन चालकाला मोठी कसरत करावी लागत आहे सदर रस्ता शिर्डी ओझर एअरपोर्ट व महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता आहे.

या रस्त्याने मोठ्या प्रकारचे वाहतूक चालू असते या खड्ड्यांमुळे मोठी अपघात होण्याची शक्यता होऊ शकते खेरवाडी गाव हे निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर यांच्या मामाचे गाव आहे आमदार यांनी आपला मामाच्या गावच्या रस्त्यात कडे लक्ष घालावे अशी मागणी नारायणगाव खेरवाडी ग्रामस्थ यांनी केली आहे.