पिंपरी (वर्धा ) येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती निमीत्त् जागतिक आदिवासी गौरव दिन

64

✒️सचिन महाजन(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9765486350

पिपंरी(वर्धा)(दि.15नोव्हेंबर):- स्वागत कॉलनी स्थित प्रगती हौ. सोसायटी येथे प्रगती सोसायटीच्या वतीने महान क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती निमीत्त् जागतिक आदिवासी गौरव दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हया कार्यक्रमाचे उदघाटन पिपरी मेघे चे सरपंच श्री अजयभाउ गौळकर हयांनी दिपज्वलन व पुष्पमाला अर्पण करून केले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संतोष चांदेकर, भगवानजी मेश्राम हे उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शन क़षी अधिकारी धामनगाव श्री विनोद गेडाम व ठाणेगाव येथील शिक्षक श्री चांभारे सर व रुपेश चिडे सर हयांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश मडावी हयांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नारायणराव कोकोटे, हे होते कार्यक्रमाचे आयोजन रामदासजी सयाम, प्रकाश रायपुरे, नेहरु युवा केद्रांचे दयाराम रामटेके, अरूण खंडाळे, ज्ञानेश्वर शेळके, प्रंशात गोलाईत, चाणाक्ष गुधबावरे संजय बोगा, एक्सेल इंडियाचे रुपेश रामटेके यानी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिनाक्षी रामटेके, योगिता गेडाम, रोहोनी मडावी, वनिता सयाम, नंदा रामटेके, कौशल्या कोकाटे, बबिता रायपुरे, साधना खंडाळे प्रिया सयाम हयांनी प्रयत्न केले तर कार्यक्रमाचे आभार ज्युलि सयाम हिने केले.