अमरावती चे महापौर चेतनभाऊ गावंडे यांनी बालदिनी रायगड किल्याचे केले परीक्षण

27

🔸बाल कलाकारांशी साधला संवाद

✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अमरावती(दि.15नोव्हेंबर):-येथिल शिवाजी नगर काॕलणी नंबर एक मधे बालकलाकारांनी एकत्र येवून रायगड किल्ला प्रतीकृती बनवला .महाराष्ट्राची संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार नविन पिढिला जागृत व सदैव प्रेरणादाई ठरत असतात.हाच वारसा व वसा पुढे सुरु ठेवत सारंग रमेश गावंडे या इंजिनियर शिकत असलाल्या युवकाने गडकिल्ले संवर्धन व ऐतिहासिक परंपरा कायम ठेवण्यासाठी रायगड किल्ला,मावळे,प्राणी,खंदक,तोफ,शस्रागार,तलवार,पताका,देऊळ,पाऊलवाट,शेत,हिरवळ,विहिर, तलाव, छोटी कौलारु घरे असा माती व दगड ,शेण,लाकडाचाभुसा यापासून हुबेहूब रायगड किल्ला तयार केला.

अमरावती महानगराचे महापौर चेतनभाऊ गावंडे यांच्या हस्ते राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पुजण करुन माल्यार्पन करण्यात आले.महापौर यांनी उपस्थित शिवाजी नगरवासियांना शिवाजी महाराजांच्या कार्याचे आपल्या शब्दांत मार्गदर्शन केले अश्या उपक्रमामाच्या माध्यमातून युवकांच्या मनात राष्ट्रप्रेम निर्मान होऊन उध्याचा सक्षम नागरिक तयार होतो या सोबतच त्यानी छोट्या मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कोरोना संकटात सर्वानी आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या व शासनामार्फत दिल्या जात असलेल्या सुचनांचे पालन करावे असे सांगीतले यामध्ये बालकलाकार सारंग गावंडे ,पार्थ,समर्थ ,श्रीजित ,उत्कर्ष,आलेख,स्वराज,प्रसन्न , काव्या,ओवी,मयंक,मंथन यांनी परीश्रम घेतले याप्रसंगी रमेश गावंडे,सोपान माहूलकर,धिरज भागवत,सुनिल शिंदे,अविनाश दातीर,अनंत मानके,नितीन प्रधान,रोहन लुंगीकर,अक्षय परीमल,प्रविण थोरवे,सचिन घाटे,दिपक अंबरते,केशव खंडारे व मोठ्या संखेने महीला उपस्थित होत्या .सुत्रसंचालन सारंग गावंडे यांनी केले तर आभार प्रा.दिपक अंबरते यांनी मानले.