वाढदिवसानिमित्त शासकीय कार्यालयांना महापुरुषांच्या प्रतिमा सप्रेम भेट

30
✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.15नोव्हेंबर):-वाढदिवस म्हटले की बॅनरबाजी, हारतुरे यावर व्यर्थ पैसे खर्च न करता काही जन वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम आयोजित करतात. त्याचप्रमाणे पुसद येथील रहिवाशी समता सैनिक दलाचे तालुका सहसंघटक प्रफुल भालेराव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शासकीय कार्यालयांना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बिरसा मुंडा ईत्यादी महापुरुषांच्या प्रतिमा सप्रेम भेट देण्याचा वैशिष्टयपूर्ण उपक्रम राबविला.

यामध्ये पोलीस स्टेशन, पंचायत समिती कार्यालय, स्थानिय ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका ईत्यादी कार्यालयामध्ये त्यांनी महापुरुषांचे फोटो भेट दिले.प्रत्येक शासकीय कार्यालयात महापुरुषांचे फोटो असावेत आणि त्यांचे त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण व्हावे हा हेतू या अभिनव उपक्रम आयोजित करण्यामागचा हेतू होता. हा उपक्रम राबविल्या बद्दल सर्वत्र प्रफुल भालेराव यांचे कौतुक होत आहे.
यावेळी गटविकास अधिकारी, शिवाजी गवई, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिभाऊ फुफाटे, ठाणेदार परदेशी, ठाणेदार बोडखे , महेश खडसे,प.स.समिती सदस्य देवेंद्रजी खडसे, शितलकुमार वानखडे, पांडुरंग व्यवहारे,सुभाष गायकवाड, अनिल हट्टेकर, विनोद मनवर, प्रशांत धुळे , बाळासाहेब कांबळे, शरद ढेंबरे, रणजित कांबळे, सुरेश हरणे, राजू भालेराव, विनोद कांबळे, आतिष दोडके इत्यादी मंडळी त्यांच्यासोबत उपस्थित होते.