लक्ष्मीपुजनाच्या दिवशी दारापर्यंत आलेली लक्ष्मी व्यापाऱ्याने केली परत

    137

    ?हाती आलेली पस्तीस हजाराची वस्तू न लपवता,व्यापाऱ्याने माणुसकी जिवंत ठेवली

    ✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

    दोडांईचा(दि.16नोव्हेंबर):- लक्ष्मी पुजनाचा दिवस भारतात तसा सर्वत्र धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. मात्र ह्या वर्षी देशावर करोनासारख्या महाभयंकर विषाणूचे सावट असतांना, जनतेने शासनाचे वेळोवेळी पुकारले गेलेले नियम, गाईडलाईन पाळत, हया आजाराशी चांगला लढा देत,यशस्वी मात करत आहे. म्हणून ह्या काळखंडात जे पण उत्सव, सण,त्योहार आले . ते सण,उत्सव , लोक अंत्यत साध्या पद्धतीने साजरा करत आहे. त्यात दिवाळी म्हटली,आली म्हणजे प्रत्येकजण लक्ष्मीचे आपापल्या आर्थिक शक्तीने स्वागत करतो.

    वरून व्यापारी म्हटला तर लक्ष्मीचा वासच त्यांचाजवळ अधिक असल्या कारणाने ते लक्ष्मी मिळवण्यासाठी दिवसरात्र राबराब राबत असतात, व अशाच मेहनतीतुन आलेल्या लक्ष्मीचे ते वर्षातुन एकदा *”लक्ष्मीपुजनच्या”* दिवशी हिशोबाच्या वह्यासह पुजन करतात. चुकून, बिगर मेहनतेतुन आलेल्या वस्तु ,लक्ष्मीचा ते कधीही स्विकार करत नाही. ह्याचा अनुभव आम्हाला नुकताच लक्ष्मीपुजनच्या दिवशी पस्तीस हजार रुपयी लक्ष्मी, मोबाईल स्वरूपात दाराजवळ आलेली असतानाही ,ती लपवून न ठेवता,गहाळ नकरता मुळ मालकापर्यत फोन लावून, अर्थात आमच्यापर्यंत पोहचवण्यात आली.

    हा अनुभव व्यापारी असोशियनचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभव घेत पाहिला. म्हणून एकीकडे मोबाईलच्या बाबतीत सांगायचे म्हटले तर प्रांणापेक्षा जीवापाड झालेला मोबाईल नजर हटी ,दुर्घटना घटी अशी परिस्थिती असताना किंवा चोरी व गहाळ झालेला मोबाईल कधीही परत मिळत नाही. त्याच काळात माणुसकी जिवंत ठेवत .पस्तीस हजाराचा मोबाईल फोन लावून परत करत व्यापाऱ्यांनी आदर्श घडवत. मेहनतीची लक्ष्मी व बिगर मेहनतीची लक्ष्मी याच्यांतले अंतर ,महत्त्व समजवले.म्हणून ही घटना सर्वसामान्यंपर्यत पाठवत , इतरांनी बोध घ्यावा व आपल्याला सापडलेला मोबाईल मुळ मालकापर्यत पोहचवावा हेच आम्हाला ह्या माध्यमातून सागांयचे आहे.

    काल लक्ष्मी पुजनचा दिवस सर्वत्र साजरा होत असताना.आमचे मित्र व्यापारी असोशियनचे माजी अध्यक्ष तथा आजी नगरसेवक नेहमीप्रमाणे संध्याकाळी चहापार्टीला भेटलो. यावेळी आम्ही लक्ष्मीपुजननिमित व्यापारी बांधवांना भेटी घेण्याचे ठरविले. त्यात कुषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जात .जवळपास तीस ते पस्तीस व्यापाऱ्यांना चालतीवर भेटी देत ,लक्ष्मी पुजनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आम्ही “हस्ती बँकेचे” अध्यक्ष यांच्या घरी भेटीसाठी गेलो असता,बसल्यावर लगेच नेहरु कुर्तोला हात लावत लक्षात आले की, मोबाईल कुठे तरी पडला.

    म्हणून सात गेले पाच राहिले,अशी मनस्थिती झाली . पण तेथे मोबाईल खिश्यातुन पडल्याचा विषय धड बोलता येईना ना, ना उठता येईना. कारण पस्तीस हजाराचा मोबाईल तीनचार महिन्यापूर्वी चालूच घेतला होता. त्यात तो भेटी दरम्यानच कुठेतरी पडला असेल, याची दाट शक्यता होती. पण समोर सर्व के.एस.ग्रुपचे मेबंर असल्यावर शुभेच्छा सोबत विचारांची देवाणघेवाणीचा पाहुणचार होणारच होता. म्हणून फक्त मोबाईलसाठी मध्येच उठणे,योग्य वाटत नव्हते. तेवढ्यात नगरसेवक यांच्या मोबाईलवर त्याच नंबरवरून फोन आला, व समोरील व्यक्तीने सांगितले की, तुमचे नाव सेव असलेला मोबाइल, आमच्या दुकानाच्या पायऱ्याजवळ मिळाला आहे. यावेळी नगरसेवक यांनी तात्काळ होकार देत.तो मोबाईल आमचाच आहे असे सांगत घ्यायला यायची शाश्वती दिली.

    यावेळी हरवलेला मोबाईल परत मिळाल्याची, चेहऱ्यावरची मनशांती लाभत,टिकवत.आम्ही परत गप्पा,विचारांची देवाणघेवाणीत लागलो. मग तेथुन उठल्यावर लगेच आम्ही मार्केट कमिटीमध्ये गेलो. तेथे आम्हाला पाहिल्यावर व्यापाऱ्यांनी जवळ येत . सेठ हा तुमचा मोबाईल येथे पायऱ्यांजवळ मोटरसायकल जवळ मिळाला. आम्ही दुकानात पुजेसाठी आलेल्या प्रत्येक वयाने लहान मोठ्या व्यापाऱ्याला विचारले,की हा मोबाईल तुमचा आहे का? पण प्रत्येकाने प्रामाणिकपणे हा मोबाईल माझा नाही, असेच सांगितले. शेवटी आम्ही मोबाइल उघडून डायल लिस्ट चेक केली. त्यात तुमचे प्रथम नाव होते.म्हणून तुम्हाला काँल लावून खात्री केली, व तुमचा लगेच होकार आल्यावर आमचाही श्वास मोकळा झाला की, मोबाईलचा खरा मालक मिळाला.

    यावेळी नगरसेवक यांनी सांगितले की, तुम्हीही प्रामाणीकपणा दाखवत .ऐवढा महागा मोबाईल परत केला. आज दुकानातून, घरातुन चोरी झालेले मोबाईल सायबर क्राईमकडे तक्रार देवून वर्षानुवर्षे सापडत नाही. पण तुम्ही माणुसकी जपत,मेहनतीने मिळवलेल्या लक्ष्मीचे महत्त्व समजत.समोरच्याला त्याचा हक्काचा मोबाईल फोन लावून परत केला, असेच जर प्रत्येकाने केले. तर समाजात मोबाईल चोरीच्या घटना घडणार नाही, हेच आम्हाला समजातील विविध घटकांना ह्या घटनेतुन सागांयचे आहे असेही शेवटी त्यांनी सांगितले.