आमलनाला तलावात उडी घेऊन युवकाची आत्महत्या

32

✒️नितेश केराम(कोरपना प्रतिनिधी

कोरपना(दि.15नोव्हेंबर):-दिवाळी च्या सारख्या सणाला कोरपना शहरातील मेडिकल स्टोअर्स मध्ये काम करणाऱ्या विकी बोरुले या तरुणांने शहरा लगतच्या अमलनाला तलावामध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. दुपारी 12ते 1 च्या दरम्यान त्याने तलावात उडी घेतली असे काही बघणारे लोकांचे म्हणणेआहे.

रात्री उशिरापर्यंत पोलीसाना त्याचे प्रेत सापडले नव्हते .हा तरुण वीवाहीत असून त्याला लहान मुलं आहे. तो मागील काही दिवसापासून फार तनावात होता असे मृत नातेवाईकाचे म्हणणे आहे. आत्महतेचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.