बलि प्रतिपदा !

32

साऱ्या विश्वाचा पोशिंदा ।
राज्य बळीचे येऊ दे ।।
उभ्या पिकांचा गोविंदा ।
इडा पिडा ती टळू दे ।।१।।

आली दिवाळी मौजेची ।
चीज कष्टाचे ठरू दे ।।
नाही दानत कोणाची ।
कृपा तुझीच राहू दे ।।२।।

येता बलि प्रतिपदा ।
नित्य स्मरण घडू दे ।।
फक्त तुच अन्नदाता ।
जगा कदर कळू दे ।।३।।

ऊन वारा पावसात ।
मती स्थिर ही पाहू दे ।।
उंच उंच गगनात ।
झेंडा तुझाच शोभू दे ।।४।।

काळ कोरोना बघता ।
दोन घास ते मिळू दे ।।
करू नको आत्महत्या ।
दया ‘कृगोनि’ येऊ दे ।।५।।

✒️कवी:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
(रयतेचा वाली, जिल्हा प्रतिनिधी)
मु.जि.गडचिरोली (९४२३७१४८८३)
इमेल – nikodekrishnakumar@gmail.com