वडद सेवादासनगर तांडा येथे गोर विद्यार्थी मेळावा संपन्न

70

🔹गोर सेना सेवादास नगर वडद यांच्यावतीने आयोजन

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.17नोव्हेंबर):-महागाव तालुक्यातील वडद सेवादासनगर तांडा येथे गोर सेनेच्या वतीने गोर विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन संत सेवालाल महाराज संस्थान येथे करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तांडयाचे नाईक नथ्थुजी चव्हाण हे उपस्थित होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून गोर सेना जिल्हाध्यक्ष किशोर पालतीया, महाराज सुदाम राठोड , शाखाध्यक्ष सुनील राठोड, प्रदीप चव्हाण, तसेच इत्यादी मान्यंवर उपस्थित होते.सर्वप्रथम संत सेवालाल महाराज व कै. वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

यावेळी दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये १० वीतील संजीवनी मांगीलाल पवार८९.२०%, समीक्षा राजेश पवार८४%, ललित अशोक पवार८३%, पायल मिनेश चव्हाण८३.६०%, प्रतिक्षा उल्हास पवार८२%, बारावीतील राजेश गणेश जाधव ७३%, मानसी राजेश पवार ७१% या विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या आई-वडिलांना पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह ,संत सेवालाल महाराज व कै. वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमा भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी मोतीराज जाधव यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. विष्णू राठोड , मुन्ना पवार ,युवराज चव्हाण ,जितेश पवार, आकाश जाधव ,आकाश आडे, विकास पवार, गोलू चव्हाण ,विकास आडे तसेच इत्यादींनी या कार्यक्रमास अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश जाधव यांनी केले तर आभार विकास पवार यांनी मानले.