21 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

35

🔺चिमूर तालुक्यातील दुःखद घटना

✒️चिमूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.17 नोव्हेंबर):- तालुक्यातील टेकेपार येथील रहिवासी तथा चिमूर पंचायत समितीचे माजी सदस्य मोतीराम कुळमेथे यांचा लहान मुलगा सौरभ (वय 21) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना दिनांक 16 नोव्हेंबर रोजी रात्री 8.30 वाजता घडली.टेकेपार जवळ असलेल्या तळोधी(नाईक) येथील पांडुरंग दहिकर विद्यालय परिसरात असलेल्या चिंचेचा झाडाला दोर बांधून आत्महत्या केल्याची घटना घडली.

आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.