“सीधा करू क्या इसको” अशी पत्रकाराला धमकी नेणारा छोटेलाल पांडे याचा व्हिडीओ व्हायरल

    42

    ?पत्रकार संदिप कसालकर यांच्यासोबत अर्वाच्य भाषेत धमकी देणारा व्हिडीओ व्हायरल

    ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    मुंबई(दि.17नोव्हेंबर):-मुंबई जोगेश्वरी परिसरात राहणारे वरिष्ठ पत्रकार यांना मुंबईतील अंधेरी पूर्व रेल्वे तिकीट काउंटर चा कर्मचारी छोटेलाल पांडे याने अर्वाच्य भाषेत बोलून “सीधा करू क्या इसको” असे धमकी देताना चा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

    दिनांक १६ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी १२:५४ च्या दरम्यान वरिष्ठ पत्रकार तसेच सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांच्यासोबत मुंबई डेज वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक अरविंद बनसोडे हे वृत्तांकन करण्यासाठी चर्चगेट या परिसरात जाण्यासाठी अंधेरी पूर्व तिकीट काउंटर या ठिकाणी तिकीट काढण्यासाठी गेले असता अंधेरी पूर्व तिकीट काउंटर या ठिकाणी कार्यरत असणारा छोटेलाल पांडे यास तिकिटासाठी विचारले असता त्याने “तुम्हाला परवाना नाही” असे म्हणून सरळ नाही म्हटले.

    या पूर्वी ३ दिवसांपूर्वी म्हणजेच १३ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ०६ वाजून ०९ मिनीटांनी अरविंद बनसोडे यांनी अंधेरी ते दादर हा प्रवास केला होता. या बाबत अरविंद बनसोडे सोबत प्रवास करणारे संदिप कसालकर यांनी एक पत्रकार म्हणून छोटेलाल पांडे यास “१३ नोव्हेंबर रोजी प्रवास केला मग आता का नाही” असे विचारपूस केली असता छोटेलाल पांडे याने संदिप कसालकर यांच्यासोबत अर्वाच्य भाषेत बोलून “इसको सीधा करू क्या” अशी धमकी दिली. दरम्यान संदिप कसालकर यांनी आम्ही पत्रकार आहोत.

    महत्वाचे वृत्तांकन करण्यासाठी जात आहोत अशी विनंती करून सुद्धा उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना अपमानित केले. संदिप कसालकर यांनी कोणत्याही प्रकारचे प्रतिउत्तर न करता ते शांत राहिले आणि पत्रकारांना अशी वागणूक देण्यात येत आहे याबाबत खंत व्यक्त केली. सदर घटना ही अत्यंत निंदनीय असून लवकरच याबाबत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांसोबत पत्रव्यवहार करण्यात येणार असून छोटेलाल पांडे यास त्याची चूक दाखवून देऊ असे संदिप कसालकर यांनी सांगितले आहे.

    दरम्यान या घटनेनंतर संपूर्ण पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. हा विषय गांभीर्याने घेऊन अंधेरी पूर्व येथील कर्मचारी छोटेलाल पांडे यास तात्काळ निलंबित करून त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड यांनी सांगितले आहे.